Home /News /maharashtra /

तुकाराम मुंडेंचा दणका, सराईत गँगस्टरचा आलिशान बंगला अखेर जमीनदोस्त

तुकाराम मुंडेंचा दणका, सराईत गँगस्टरचा आलिशान बंगला अखेर जमीनदोस्त

संतोष आंबेकरने अनेक वर्षे गँग चालवून कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. त्याने याच बंगल्यात अनेक काळे कारनामे केले होते.

नागपूर, 25 फेब्रुवारी : नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडका लावला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अनधिकृत असलेल्या सराईत गँगस्टर आणि गुंड संतोष आंबेकरचा इतवारी परिसरातील आलिशान बंगला पाडण्यात आला आहे. संतोष आंबेकरने अनेक वर्षे गँग चालवून कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. त्याने याच बंगल्यात अनेक काळे कारनामे केले होते. अनेकांना मारहाण, खंडणीसाठी टॉर्चर, अनेक तरुणींवर बलात्कार असे अनेक घटना आंबेकरने याच बंगल्यातच केल्या होत्या. ऑक्टोबर महिन्यापासून पोलिसांनी संतोष आंबेकर विरोधात कारवाई करत 12 ऑक्टोबरला त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याच्या विरोधात आतापर्यंत मारहाण, खंडणी, बलात्कार, लुबाडणूक असे वेगवेगळे 18 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी संतोष आंबेकर विरोधात मकोका अंतर्गत ही कारवाई करत त्याचे साम्राज्याचा उद्ध्वस्त करणे सुरू केले होते. तेव्हा पासून त्याचा अनधिकृत बांधकाम पाडला जाईल अशी माहिती होती. मात्र, महापालिकेत त्यासंदर्भातला निर्णय अडकला होता. नुकतंच नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आंबेकर याचे प्रकरण सांगून त्याचा अनधिकृत बंगला पडण्याची कारवाई मनपामध्ये अडल्याचं सांगितलं. तुकाराम मुंढे यांनी गेले अनेक आठवडे अडकलेली कारवाई लगेच करण्याचे आदेश दिले आणि आज (मंगळवारी) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. इतवारी परिसरात संतोष आंबेकर याचा प्रशस्त आणि जयपुरी गुलाबी दगडाने सजवलेला बंगला कोट्यवधी रुपयांचा आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत तीन 2 जेसीबी आणि 1 पोकलँडच्या मदतीने या गँगस्टरचा बंगला पाडण्यास सुरूवात केली. यावेळी मोठा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या