मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भयंकर ! सांगलीत पूर्ववैमनस्यातून तिहेरी खून, चौघे गंभीर जखमी

भयंकर ! सांगलीत पूर्ववैमनस्यातून तिहेरी खून, चौघे गंभीर जखमी

 सांगलीच्या (Sangli) पलूस (Palus) तालुक्यातील दुधोंडी (Dudhondi) या गावात तिहेरी खून (Tripple Murder) झाला आहे. पूर्ववैमनस्यातून दुधोंडी येथील वसंतनगरमध्ये हा तिहेरी खून झाला आहे.

सांगली, 1 ऑगस्ट : सांगलीच्या (Sangli) पलूस (Palus) तालुक्यातील दुधोंडी (Dudhondi) या गावात तिहेरी खून (Tripple Murder) झाला आहे. पूर्ववैमनस्यातून दुधोंडी येथील वसंतनगरमध्ये हा तिहेरी खून झाला आहे.  यामध्ये चार जखमी आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मोहिते आणि साठे गटात हा तुफान राडा झाला आहे.

काय होता वाद

दुधोंडी गावात मोहिते आणि साठे या गटात गेल्या कित्येक वर्षांपासून वैमनस्य होतं. दोन्ही गटांकडून एकमेकांना आव्हानं आणि प्रतिआव्हानं दिली जात होती. एकमेकांविषयी प्रचंड राग मनात असणारे हे दोन गट कधी एकदा दुसऱ्याचा काटा काढण्याची संधी मिळते, याची वाट पाहत होते. थोड्याथोडक्या काऱणावरूनदेखील मोठी आग भडकावी, असं चित्र गावात होतं. शनिवारी रात्री नेमकी ही ठिणगी पडली आणि वाद विकोपाला गेला.

नेमकं काय घडलं?

रात्रीच्या सुमाराला या दोन गटांमध्ये वाद झाला होता. वाद झाल्यावर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीचा आढावा घेण्यासाठी सकाळी पोलीस स्टेशनला जात असताना एका गटाने दुसऱ्यावर धारधार शास्त्रानी वार केले. त्याला दुसऱ्या गटाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या तुंबळ हाणामारीत सात जण गंभीर जखमी झाले होते. यापैकी तिघांच्या वर्मी घाव बसल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे वाचा - ..अन् शॉक लागून वायरमनचा मृत्यू; खांबावरच लटकला मृतदेह, सांगोल्यातील घटना

या घटनेत अरविंद साठे (वय 52), विकास मोहिते (वय 32) आणि सनी मोहिते (वय 28) यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Sangli (City/Town/Village)