मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबईच्या एन्ट्री पॅाइंटवर टोल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, ‘या’ मार्गांचा करा वापर, नाहीतर कामाचा होईल खोळंबा

मुंबईच्या एन्ट्री पॅाइंटवर टोल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, ‘या’ मार्गांचा करा वापर, नाहीतर कामाचा होईल खोळंबा

मुंबईच्या एन्ट्री पॅाईंटवर टोल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, ‘या’ मार्गांचा करा वापर, नाहीतर कामाचा होईल खोळंबा

मुंबईच्या एन्ट्री पॅाईंटवर टोल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, ‘या’ मार्गांचा करा वापर, नाहीतर कामाचा होईल खोळंबा

Toll Employees Protest: मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर असलेल्या पाच टोलनाक्यांवर टोल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळं काही टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई, 26 जुलै: कामानिमित्त मुंबईमध्ये जाणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर (Toll Plaza in Mumbai) असलेल्या पाच टोलनाक्यांवर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन (Toll Employees protest) सुरु केलं आहे. गेल्या दोन महिन्यापासून वेतन न मिळाल्याचं सांगत या कर्मचाऱ्यांनी टोल वसूल करणाऱ्या एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडविरुद्ध (MEP INFRASTRUCTURE DEVELOPERS LTD) काम बंद आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान टोल कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळं काही टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळं अनेक वाहनधारक वाहतूक कोंडीत अडकून वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी परिस्थितीचा अंदाज घेऊनच बाहेर पडा, नाहीतर मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडनं थकवलं कर्मचाऱ्याचं वेतन-

मुंबईत दररोज हजारो लोक विविध कामांसाठी येत असतात. मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी 5 एन्ट्री पॉईंट्स आहेत. मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी लोकांना ऐरोली, वाशी, दहिसर, लाल बहादूर शास्त्री मार्ग- मुलुंड आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे- मुलुंड येथील पाच टोलनाक्यांवरून यावं लागतं. या सर्व टोलनाक्यांवरील टोलवसुलीची जबाबदारी एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडकडे आहे. सायन-पनवेल हायवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे कॉरिडॉर, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे कॉरिडॉर, लाल बहादूर शास्त्री मार्ग कॉरिडॉर आणि ऐरोली ब्रीज कॉरिडॉरवरील 27 फ्लायओव्हर्ससह पाच एन्ट्री पॉइंट्सची देखभाल आणि टोल वसूल करण्याची जबाबदारी एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडकडे (MEP INFRASTRUCTURE DEVELOPERS LTD) आहे.

हेही वाचा: 'तुमच्यात कर्तृत्व नाहीये; तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका', उद्धव ठाकरेंच्या मनातील खदखद अखेर बाहेर

दरम्यान एमईपीनं ऐरोली, वाशी, दहिसर, लाल बहादूर शास्त्री मार्ग- मुलुंड आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे- मुलुंड या पाच टोलनाक्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगार दिला नाही. त्यामुळं संतप्त कर्मचाऱ्यांनी टोलनाक्यांवरच काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळं वाहतुकीला अडथळा होत असून काही टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा वाढू लागल्या आहेत. ऐन सकाळी कामावर जायची वेळ असताना टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळं मुंबईत येणाऱ्या लोकांना त्रासाला सामोरं जावं लागू शकते.

पर्यायी मार्गांचा करा वापर-

मुंबई एन्ट्री पॉईंटवरील पाच टोलनाक्यांवर MEP च्या कर्मचाऱ्यांनी वेतन न दिल्यामुळं आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळं वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. काही टोलनाक्यांवर आधीपासूनच वाहनांच्या रांगा आहेत. त्यामुळं या मार्गांने जाणाऱ्या वाहनधारकांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रवास करण्याचा निर्णय घ्यावा. त्यासाठी तुम्ही गुगल मॅपची मदत घेऊ शकता. वाहतूक कोंडीचा अंदाज घेऊनच बाहेर पडा, नाहीतर कामाचा खोळंबा होऊ शकतो. शक्य झाल्यास पर्यायी साधनांचा वापर करावा. ज्यांना कामानिमित्त मुंबईत जायचंचं आहे, असे लोक आज ट्रेनसारख्या पर्यायी मार्गांचा वापर करू शकतात.

First published:

Tags: Toll news, Toll plaza, Traffic, Traffic disrupted