सुनिल घरत प्रतिनिधी, शहापूर : शाळा सुरू होत असल्याने आता मुंबई किंवा नाशिक या दरम्यान चाकरमनी आपल्या घरी परतत आहेत. यावेळी त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. तुम्ही जर अजूनही घराबाहेर पडला नसाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मुंबई - नाशिक महामार्गावर वशिंदजवळ दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यामध्ये ट्रक बंद पडल्याने आणि वाशिद येथील हायवे इथे पुलाचे काम चालू असल्याने दोन्ही बाजूच्या वाहनांना जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावं लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळत आहे.
ऑनलाईन वाहन चलानमुळे मोडला व्यक्तीचा संसार, नक्की असं काय घडलं?मुंबई - नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, प्रवास करण्याआधी @News18lokmat वर पाहा अपडेट्स#traffic #mumbai #Nashik #Marathinews pic.twitter.com/FBE5tlQGW6
— News18Lokmat (@News18lokmat) June 14, 2023
महामार्गावरील वाहतूक कोंडी चार फटका केंद्रीय पंचायतराज मंत्री व भिवंडी खासदार कपील पाटील यांना बसला. मुंबई नाशिक महामार्गावर कासणे ते वाशिंद दरम्यान वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी चा फटका केंद्रीय पंचायतराज मंत्री व भिवंडी खासदार कपील पाटील यांना बसला आहे.
कपील पाटील हे 11 वाजता वाशिंद येथे रेल्वे उड्डाणपूलाच्या उद्घाटन करण्यासाठी येत आहे महामार्गावरील वाहतूक कोंडी मुळे ते वेळेवर पोहोचू शकत नाही गेल्या एका तासा पासून वाहतूक कोंडी झाली आहे.