मुंबई-गोवा महामार्गावर कोसळेली दरड हटवली, वाहतूक सुरळीत सुरू

मुंबई-गोवा महामार्गावर कोसळेली दरड हटवली, वाहतूक सुरळीत सुरू

रायगडमधील महाडजवळ केबुर्ली इथं ही दरड कोसळली आहे. तिथे काही वेळापूर्वीच दरड हटवण्याचं काम सुरू झालंय.

  • Share this:

महाड, 05 जुलै : मुंबईसह राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे.पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली असून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रायगडमधील महाडजवळ केबुर्ली इथं ही दरड कोसळली.तिथे काही वेळापूर्वीच दरड हटवण्याचं काम सुरू झालं. मुंबई-गोवा महामार्गावर कोसळेली दरड हटवली आहे आणि वाहतूक सुरळीत सुरू झालीय.

दोन जेसीपी आणि एका क्रेनच्या सहाय्याने दरडीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेच प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना दिली आहे.

काेसळलेल्या दरडीत दगडांपेक्षा लाल मातीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे  चिखलावरून वाहने घसरण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी काेणत्याही प्रकारे घाई करू नये. वाहतूक पाेलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वराडे यांनी केले आहे.

हेही वाचा

Reliance AGM 2018:आज रिलायन्स इंडस्ट्रीजची 41 वी वार्षिक सभा

६ सप्टेंबरपर्यंत टोलबंदीबाबत राज्य सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

आता गुहेतच 'त्या' मुलांना दिलं जाणार पोहण्याचं प्रशिक्षण

दरम्यान, मुंबईकडून गाेव्याकडे जाण्याकरता छाेट्या वाहनांसाठी  माणगांव-निजामपूर-पाचाड-महाड हा पर्यायी मार्गदेखील उपलब्ध आहे.

First published: July 5, 2018, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading