मुंबई, 23 जानेवारी: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची (Balasaheb Thackeray Birth Anniversary)आज 96 वी जयंती आहे. या निमित्तानं दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर फुलांनी सजावट करण्यात आली आहे. आजच्या दिवशी स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, मान्यवर दाखल होतायेत आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं (Balasaheb Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं सावट असल्यामुळे बाळासाहेबांची जयंती साधेपणानं साजरी करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिरे आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो. उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी साधणार ऑनलाईन संवाद शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज शिवसैनिकांसोबत संवाद (Uddhav Thackeray will interact with Shivsainik) साधणार आहेत. आज ऑनलाईन माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. आज 23 जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिकांना काय आदेश देणार? येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.