मुंबई, 14 जून: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज म्हणजे 14 जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरेंचा आज (14 जून) 54 वा वाढदिवस आहे. मात्र तब्येत ठिक नसल्यानं राज ठाकरे आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत. त्यामुळे राज्यभरात कार्यकर्ते मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. “माझी शस्त्रक्रिया होत असल्याने मी माझ्या वाढदिवसाला कोणालाही भेटू शकणार नाही,” असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी राज ठाकरेंना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येत असतात. कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे-मुंबई दौरा? सध्या राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं आहे. तसंच त्यांची हिप बोनची शस्त्रक्रिया ही होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची शस्त्रक्रिया होणार होती. मात्र त्यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्यानं ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात होणार आहे. यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचं आवाहन केलं. राज ठाकरेंचं मनसेच्या कार्यकर्त्यांना आवाहन “वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या” 14 तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया रद्द झाली. आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार नको म्हणून यावेळी वाढदिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या.", असं राज ठाकरेंनी आपल्या ऑडिओ पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.