जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, असा असेल पुणे- मुंबईतल्या कार्यक्रमांचं Timetable

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, असा असेल पुणे- मुंबईतल्या कार्यक्रमांचं Timetable

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, असा असेल पुणे- मुंबईतल्या कार्यक्रमांचं Timetable

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या (Maharashtra Today) दौऱ्यावर आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे आज महाराष्ट्राच्या (Maharashtra Today) दौऱ्यावर आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहूमध्ये मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ते मुंबईला रवाना होतील. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) गैरहजर राहणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आणि मुंबईतील (Pune and Mumbai) विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील. प्रथम पुण्यातल्या देहू येथील कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित असतील. त्यानंतर मुंबईतल्या तीन कार्यक्रमांना त्यांची हजेरी असेल. देहूतल्या कार्यक्रमावेळी ते वारकऱ्यांशीही संवाद साधतील. कसा असेल पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा

  • आज दुपारी 1:45 च्या सुमाराला पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील.
  • देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मुंबईसाठी रवाना होतील.
  • मुंबईतील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करणार.
  • संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मोदी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार

नवीन जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा या क्रांतिकारकांच्या दालनाचा उदघाटन सोहळा राजभवन इथं पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत फडणवीस यांनी शिवसेनेला शह दिला होता. त्यानंतर दोन्ही नेते एकत्र येणार आहे. पुण्यात मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार नरेंद्र मोदींच्या हस्ते आज रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. साधारण दीड ते दोन तास हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. देहूमध्ये कडेकोट बंदोबस्त पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला असून देहूला अगदी छावणीचे स्वरूप आले असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या मुख्य मंदिर परिसर, सभेचे ठिकाण आदी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त केला आहे. स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात