मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लाखो लोकांना हसवणारा जाताना रडवून गेला! विजेचा शॉक लागल्याने बीडच्या टिकटॉक स्टारचा मृत्यू

लाखो लोकांना हसवणारा जाताना रडवून गेला! विजेचा शॉक लागल्याने बीडच्या टिकटॉक स्टारचा मृत्यू

विजेचा शॉक लागल्याने बीडच्या टिकटॉक स्टारचा मृत्यू

विजेचा शॉक लागल्याने बीडच्या टिकटॉक स्टारचा मृत्यू

टिकटॉक स्टार संतोष मुंडे आणि त्याचा मित्राचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड, 13 डिसेंबर : आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांना हसवणाऱ्या टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. संतोषसह आणखी एका तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीडचा संतोष मुंडे याने टिकटॉर आणि रिल्सच्या माध्यमातून अल्पवधीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या विनोद शैलीने त्याला लाखो फोलोवर्स झाले होते. यी टिकटॉक स्टार संतोष मुंडे आणि आणखी एका तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. बायकोने टीकटॉक स्टारला शेळी सांभाळायला लावली.. म्हणत हसवणारा, हसत हसत ग्रामीण जनतेच्या समस्या वेशीला टांगणारा, ग्रामीण व अस्सल माराठवाड्याच्या बोली भाषेतून आपल्या अभिनयाने खळखळून हसवणारा संतोष आज चहात्यांना रडवून गेला, अशीच काहीशी अवस्था बीडकरांची झाली.

वाचा - 'सगळ्यांच्या डिप्रेशनचा ठेका तू घेतलास का?'; प्रसाद आणि किरण मानेमध्ये मोठा वाद

काय आहे घटना?

धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील टिकटॉक स्टार संतोष मुंडे व त्याचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विज आल्यामुळे दोघांचा करंट लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच समाज माध्यमातून तीव्र दुखः व्यक्त केले जात आहे.

संतोष मुंडे याने टिकटॉकच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याला मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स असून त्याच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Beed, Tiktok star