बिग बॉस मराठी 4 च्या घरात नुकतंच नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे. ज्यामध्ये घरात राहण्यास अपात्र सदस्यांमध्ये अमृता देशमुख, प्रसाद, अमृता धोंगडे, विकास, अपूर्वा आणि किरण यांची नावे आली.
2/ 8
आज होणाऱ्या भागात किरण आणि प्रसादमध्ये तुफान राडा होणार आहे.
3/ 8
प्रसाद किरणला म्हणाला, सगळ्यांच्या डिप्रेशनचा ठेका तू घेतला आहेस का?
4/ 8
किरण म्हणाला, नाही घेतला... जे समोर दिसत आहे ते सांगतो आहे. काही विमझिकल लोकांना शनिवारी ठरवून डिप्रेशन येतं आणि रविवारी ते जातं.
5/ 8
प्रसाद म्हणाला, तू कोण आहेस ठरवणारा विमझिकल वैगरे ? डॉक्टर आहेस का तू? त्यानंतर दोघींची चांगलीच जुंपते.
6/ 8
त्यामुळे आज प्रसाद आणि किरण मानेंमध्ये चांगलीच हमरातुमरी होताना दिसणार आहे.
7/ 8
दोघेही एकमेकांना भिडणार असून घरात काय नवा ड्रामा होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
8/ 8
बिग बॉसच्या घरात आज आणखी काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.