Home /News /maharashtra /

Kurla Building Collapse : कुर्ला इमारत दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, 11 जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Kurla Building Collapse : कुर्ला इमारत दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, 11 जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

मुंबईतील शहरातील कुर्ला नाईक नगर भागात घडली आहे. (Kurla Building Collapse) ऐन पावसाळ्याच्या तोंडावर येथे 4 मजली इमारत कोसळली

  मुंबई, 28 जून : मुंबईत पावसाळ्याच्या (Mumbai rain) दरम्यान जुन्या इमारती कोसळून मोठे अपघात होतात. याबाबत प्रशासनाकडून कितीही काळजी घेतली तरी दरवर्षी हे प्रकार पाहायला मिळतात. यात कित्येक लोकांचे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईतील शहरातील कुर्ला नाईक नगर भागात घडली आहे. (Kurla Building Collapse) ऐन पावसाळ्याच्या तोंडावर येथे 4 मजली इमारत कोसळली (building collapses in Mumbai kurla area) आहे. यात अनेकजण दबले आहेत. आतापर्यंत 3 मृत्यूमुखी (Kurla Building Collapse 3 death) पडल्याची माहिती समोर आली आहे तर 11 जखमी असल्याचे सांगण्यात आले.

  प्रशासकीय सुत्रांच्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास मुंबईतील कुर्ला नाईक नगर भागात एक 4 मजली इमारत कोसळून मोठा अपघात घडला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक दबले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमनदल आणि पोलीस पोहचले आहे. याठिकाणी स्थानिक लोकांच्या मजतीने बचावकार्य राबवले जात आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत तर 11 जखमी आहेत. अद्यापही अडकलेल्या लोकांना काढण्याचे काम सुरू आहे.

  हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, राज्याच्या राजकारणाला मिळणार नवे वळण

  दरम्यान याबाबत मंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली बिल्डिंगखाली अडकेलेल्या लोकांना काढण्याचे काम सुरू आहे. आम्ही सर्वतोपरी मदत करत बिल्डिंगखाली अडकेलेल्या लोकांना वाचवण्याचे काम करत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

  शिंदे गटही मदतीला

  मुंबईतील कुर्ला येथे नाईक नगर भागात घडली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर येथे 4 मजली इमारत कोसळली (building collapses in Mumbai kurla area) आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहेत. जखमींच्या मदतीला शिंदे गट धावून आला आहे.

  इमारत दुर्घटनेत अडकलेल्या काही लोकांना स्थानिक नागरिकांनी मदत केली. अग्निशामक दल, महानगरपालिका व पोलिस यंत्रणा यांच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे. दुर्घटनेतील मृत नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची तर जखमी नागरिकांना 1 लाखांची मदत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सुचनेनुसार स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या वतीने करण्यात येणार आहे. जखमींना उपचारासाठी राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  हे ही वाचा : '2-3 दिवसात भाजपचं सरकार येणार; यंदाची आषाढी एकादशी पूजा फडणवीसच करणार', भाजप खासदाराचा दावा

  इमारत कोसळल्याची माहिती मिळताच आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यासोबतच बचावकार्य आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, सर्व 4 इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र असे असतानाही येथे लोक राहत होते. सर्वांना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे. आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी आम्ही या इमारती रिकाम्या करून पाडण्याचे काम करू.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Mumbai, Thane building collapse

  पुढील बातम्या