Home /News /maharashtra /

Beed Accident: बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना धडक देत 100 फूट फरफटत नेलं, तिघांचा मृत्यू

Beed Accident: बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना धडक देत 100 फूट फरफटत नेलं, तिघांचा मृत्यू

बीड येथे भीषण कार अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. (car accident in beed) ही घटना समोर रात्री घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बीडच्या घाटनादूर (car accident in ghatnandur) येथे घडली.

पुढे वाचा ...
बीड, 5 एप्रिल : बीड येथे भीषण कार अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. (car accident in beed) ही घटना समोर रात्री घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बीडच्या घाटनादूर (car accident in ghatnandur) येथे घडली. असा झाला अपघात - माहितीनुसार, सोमवारी रात्री जवळपास दहा वाजेच्या सुमारास अंबेजोगाईच्या दिशेने एक कार वेगात आली. याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्टॉलवर उभ्या चार जणांना या कारने जोरदार धडक दिली. (car hit four in ghatnandur beed) हा अपघात इतका भीषण होता की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा मृत्यू रुग्णालयात झाला. तर या व्यतिरिक्त आणखी एक जण गंभीर जखमी आहे. वैभव सतीश गिरी (वय 28), लहू बाबन कातुले (वय 30), रमेश विट्ठल फुलारी (वय 47) अशी मृतांची नावे आहेत. (three died in ghatnandur) या कारमध्येही तीन जण प्रवास करत होते. स्टॉलवर उभ्या चार जणांना धडक दिल्यानंतर वीजेच्या खांबावर ही कार आदळली. कारमधील तीनही जखमी झाले आहेत. प्रवासादरम्यान, हे तिघे नशेत होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. घटनेनंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर रमेश फुलारी या 47 वर्षीय व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर यासोबतच 50 वर्षाचे उद्धव निवृत्ती दोडतले गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणाचा तपास सुरू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

केवळ संजय राऊतच नाही तर आपच्या बड्या नेत्यावरही कारवाईचा बडगा, ईडीकडून कोट्यवधींची संपत्ती जप्त

रेल्वेचाही अपघात, दहा डबे घसरले -  या आधी महाराष्ट्रातील नाशिकजवळच्या लहाविट आणि देवळाली स्थानकामध्ये रविवारी दुपारी लोकमान्य टिळक - जयनगर एक्सप्रेस (पवन एक्सप्रेस) रेल्वेचे 10 डबे रुळावरुन घसरले. (train derailed)  या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय आणि मदत पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भुसावळ विभागात दुपारी 3.10 च्या सुमारास हा अपघात झाला.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Accident, Crime news, Maharashtra News, Railway accident

पुढील बातम्या