Home /News /maharashtra /

Ratnagiri Murder : रत्नागिरीत भयानक घटना, तीन वृद्ध महिलांची आमानुष हत्या, संपूर्ण जिल्हा हादरला

Ratnagiri Murder : रत्नागिरीत भयानक घटना, तीन वृद्ध महिलांची आमानुष हत्या, संपूर्ण जिल्हा हादरला

रत्निगिरी जिल्ह्यात एका घरात तीन महिलांचे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळले आहेत. विशेष म्हणजे या तीनही महिला अतिशय वृद्ध आहेत. तरीदेखील त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.

रत्नागिरी, 14 जानेवारी : काही घटना इतक्या विचित्र आणि भयानक असतात की त्या घडल्या कशा? या विचारातच आपण चक्रावून जातो. रत्नागिरीच्या (Ratnagiri) दापोली (Dapoli) तालुक्यातील वनोशी खोतवाडीत अशीच एक घटना घडली आहे. खोतवाडी (Khotwadi) परिसरातील एका घरात तीन महिलांचे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह (deadbody) आढळले आहेत. विशेष म्हणजे या तीनही महिला अतिशय वृद्ध आहेत. तरीदेखील त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तीनही मृतदेहांवर अॅसिड (acid) आणि पाण्याचे द्राव्य असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. विशेष म्हणजे तीनही महिलांचे मृतदेह हे घरातील वेगवेगळ्या खोलीत आहेत. एका महिलेता मृतदेह हा घराच्या पहिल्या खोलीत आहे. दुसरा मृतदेह हा बेडरुममध्ये आहे. तर तिसरा मृतदेह हा किचनमध्ये आढळलेला आहे. अत्यंत थरारक अशी ही घटना आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीय. पण या घटनेची उकल करणं पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे. नेमकं प्रकरण काय? संबंधित घटना ही वनोशी खोतवाडीत परबत पाटणे यांच्या घरी घडली आहे. परबत पाटणे यांना दोन पत्नी होत्या. त्यांच्या 90 वर्षीय पहिल्या पत्नीचं नाव पार्वती परबत पाटणे असं आहे. तर दुसऱ्या पत्नीचं नाव सत्यवती परबत पाटणे असं आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या. या दोन्ही सवतींचा पाटणे यांच्या घरात संशयस्पदरित्या मृतदेह आढळले आहेत. याशिवाय 80 वर्षीय इंदूबाई शांताराम पाटणे या महिलेचा देखील घरात मृतदेह आढळला आहे. तीनही महिलांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याची माहिती जेव्हा परिसरातील नागरिकांना मिळाली तेव्हा मोठी खळबळ उडाली. या घटेनची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. (शहापुरमध्ये सेना अन् काँग्रेस उमेदवारांना हरवण्यासाठी अघोरी प्रकार, फोटो व्हायरल) घटना मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळीच घडल्याचा अंदाज पोलिसांनी केलेल्या तपासात घटनेची सविस्तर माहिती समोर आली. पण हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे. खोतवाडीतील मृतक तीनही वयोवृद्ध महिला रात्री नेहमी एकत्र झोपत असत. नेहमीप्रमाणे त्या काल रात्रीदेखील एकत्र झोपल्या. पण सकाळी हा दुर्दैवी प्रकार घडला. नेमका हा प्रकार रात्री घडला की सकाळी घडला? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण रक्त ताजी असल्यामुळे हा प्रकार सकाळी घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (कानाचा चावा घेत पाठीत खुपसला स्क्रू ड्रायव्हर, पुण्याला हादरवणारी घटना) पार्वती आणि सत्यवती या दोघीही सवती आहेत. त्या दोघींना मूलबाळ नसल्याने त्यांचा पुतण्या सांभाळ करत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. तर शेजारीच राहणार्‍या इंदुबाई पाटणे यांचा मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो. त्यामुळे त्याही घरी एकट्याच असतात. तीनही महिला नातेवाईक असल्याने रात्री एकाच घरात राहत. पण मकरसंक्रातीच्या दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे साऱ्या पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. तीन वृद्ध महिलांच्या हत्येने रत्नागिरी जिल्हा हादरला विशेष म्हणजे तीन महिलांचा खून झाल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी वयोवृद्ध महिलांचा निर्घृणपणे खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण हा खून नेमका कशासाठी झाला? त्याचे धागेदोरे अजून तरी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या घराच्या वेगवेगळ्या खोलीमध्ये तीनही महिलांचा मृतदेह आढळून आल्याने जीव वाचवण्यासाठी पळण्याच्या नादात त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक मृतदेह किचनच्या खोलीच्या दारात दुसरा मृतदेह हॉलच्या प्रथम दर्शनी दरवाजामध्ये तर तिसरा मृतदेह बेडरूमच्या दारामध्ये अर्धवट जळलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला आहे. पोलिसांनी ही हत्या असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या