Home /News /crime /

पतीसह 4 मुलांना वाऱ्यावर सोडून महिलेनं थाटला दुसरा संसार, प्रकरण आलं अंगलट

पतीसह 4 मुलांना वाऱ्यावर सोडून महिलेनं थाटला दुसरा संसार, प्रकरण आलं अंगलट

38 वर्षीय विवाहित महिलेला चार मुलं असून तिने आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट न देता दुसरा संसार थाटला आहे. याप्रकरणी पीडित पतीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं दुसरं लग्न करणं संबंधित महिलेच्या अंगलट आलं आहे.

  यावल, 12 मार्च: घरातील किरकोळ भांडणातून माहेरी गेलेल्या एका विवाहित महिलेनं दुसऱ्या एका व्यक्तीशी लग्न केल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहेरी गेलेली आपली पत्नी परत का येत नाही, हे पाहण्यासाठी सासुरवाडीला गेलेल्या पतीला हे प्रकरण पाहून धक्काच बसला आहे. पहिल्या पतिसोबत घटस्फोट न घेता आरोपी महिलेनं दुसऱ्याच एका व्यक्तीशी लग्न केलं आहे. याप्रकरणी पीडित पतीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं दुसरं लग्न करणं संबंधित महिलेच्या अंगलट आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार; संबंधित 38 वर्षीय विवाहित महिलेला चार मुलं असून तिने आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट न देता दुसरा संसार थाटला आहे. याप्रकरणी यावला तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी असलेल्या पती प्यारसिंग भाया बारेला यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडित पतिने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची 38 वर्षीय पत्नी बोंदरीबाई बारेला ही गेल्या वर्षी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर  आपल्या माहेरी निघून गेली होती.

  (वाचा - अकोला हादरलं! मुलीच्या नावावर जमीन केल्यानंतरही आईची दगडावर आपटून केली हत्या)

  आरोपी महिलेचं माहेर मध्य प्रदेशातील धोपा याठिकाणी आहे. तिने माहेरी जाताना आपली चारही मुलं नवऱ्याच्याच घरी सोडली होती. या महिलेचा सर्वात मोठा मुलगा 9 वर्षांचा असून 8 आणि 6 वर्षांच्या दोन मुली आहे. तर तिला 6 महिन्यांचं बाळ देखील होतं. असा सर्व परिवार असताना घरात झालेल्या किरकोळ वादातून महिलेनं पोटच्या सर्व लेकरांना सासरी टाकून माहेर गाठलं होतं. यानंतर पती प्यारसिंग बारेला याने पत्नीला माघारी येण्याची वारंवार विनंती केली. मात्र वर्ष उलटून गेल्यानंतरही पत्नी परत आली नाही. त्यामुळे पती स्वतः आपल्या सासुरवाडीला गेला. त्यानंतर आपल्या पत्नीनं केलेला प्रकार पाहून पतिला धक्काच बसला. (वाचा -रिक्षाचं भाडं मागणं पडलं महागात; प्रवाशाने चालकाच्या डोक्यात दगड घालून केला खून) आपल्या पत्नीने भगवानपुरा येथील भल्या इतू वास्कले नावाच्या व्यक्तीसोबत चक्क लग्न केल्याचं फिर्यादीला समजलं. यानंतर पती प्यारसिंग बारेला याने यावल पोलीस ठाण्यात पत्नी बोंदरीबाई बारेला, तिचे वडील तुताराम अंकऱ्या बारेला आणि तिचा दुसरा पती भल्या वास्कले या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, India, Love story, Madhya pradesh, Relationship

  पुढील बातम्या