ठाणे, 16 ऑगस्ट : पुर्वी राजा विरोधात चोर, दरोडेखोर एकत्र यायचे याचा अर्थ राजा चांगले काम करतो असं सिद्ध व्हायचं आता दिल्लीत सर्व भाजपा विरोधी नेते (Opposition leaders) एकत्र येत आहेत. याचा अर्थ नरेंद्र मोंदीजींचे (Narendra Modi) काम चांगले सुरु असून लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे हे एकत्र येणारे सर्वजण भ्रष्टाचारी आहेत (All are corrupted) असा विरोधकांवर हल्लाबोल केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील (Union Minister Kapil Patil) यांनी केला आहे. याचसोबत मी मंत्री झाल्या बरोबरच नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे याकरता तात्काळ उड्डाण मंत्र्यांची विमानतळ संघर्ष समिती सोबत भेट घडवून दिली ही माहिती केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
जन आशिर्वाद यात्रे दरम्यान ठाण्यातील तलावपाळी येथील अश्वरुढ छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्यास पुष्पाहार अपर्ण करण्यास केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर टोलनाका येथून कपिल पाटील यांच्या जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात झाली ते वागळे इस्टेट, इंदिरा नगर, मासूंदा तलाव करत पुढे टेंभी नाका येथून पुढे जाऊन ठाणे शहरातील कपिल पाटील यांची जन आशिवार्द यात्रा माजीवडा येथे संपन्न झाली. मात्र कळवा, मुंब्रा, शिळफाटा करत डोंबिवली कल्याण अशी ही कपिल पाटील यांची यात्रा पुढे गेली.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी राज ठाकरेंना दिला 'हा' सल्ला, म्हणाले...
नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यात ठाणे जिल्ह्यातून भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात स्थान मिळाले. ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच केंद्रीय मंत्रीमंडळात ठाणे जिल्हायाच्या खासदारांना स्थान दिले गेले आहे. या मुद्द्याचा भाजपा चांगलाच फायदा उठवत असून फेब्रुवारी महिन्यात ठाणे, कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या नगर आणि महानगरपालिकांच्या निवडणूका आहेत याच पार्श्वभूमीवर ही जन आशीवार्द काढून वातावरण निर्मिती केली जातेये अशी देखील चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार विरोधात देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांची ही एकजूट संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा दिसून आली. त्यानंतर आता सोनिया गांधी सुद्धा येत्या 20 ऑगस्ट रोजी देशातील विरोधी पक्षातील नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.