मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'हा देश केंद्र सरकारच्या पैशावर चालतो', रावसाहेब दानवेंचा अजब दावा, VIDEO

'हा देश केंद्र सरकारच्या पैशावर चालतो', रावसाहेब दानवेंचा अजब दावा, VIDEO

'पेट्रोलचे दर हे जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहे. ते किंमत वाढवण्याचे काम आता केंद्र सरकार करत नाही'

'पेट्रोलचे दर हे जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहे. ते किंमत वाढवण्याचे काम आता केंद्र सरकार करत नाही'

'पेट्रोलचे दर हे जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहे. ते किंमत वाढवण्याचे काम आता केंद्र सरकार करत नाही'

औरंगाबाद, 14 नोव्हेंबर : भाजपचे (bjp) नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी एक नवीन दावा केला आहे. 'हा देश चालला असेल तर केंद्र सरकारच्या पैशावर चालला आहे' असा दावाच दानवे यांनी केला आहे.

औरंगाबादमध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना रावसाहेब दानवे यांनी इंधन दरवाढीवरून नवी तर्क लढवला आहे.

केंद्र सरकारने इंधनावरचा आपला कर कमी केला आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी झाले, पण काँग्रेस असलेले सरकार आपला कर कमी करत नाही. लोकांना आपण हे सांगितलं पाहिजे, हा देश केंद्र सरकारच्या पैशावर चालला आहे, असा दावाच दानवेंनी केला.

तसंच, पेट्रोल महाग झाले म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेनं मोर्चा काढला. पेट्रोलबद्दल अर्थमंत्री बोलले यावर मी बोलणं योग्य नाही. पण, पेट्रोलचे दर हे जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहे. ते किंमत वाढवण्याचे काम आता केंद्र सरकार करत नाही. काल ३५ पैसे कमी झाले, आता ५० पैसे वाढले हे काही आपलं सरकार खालीवर करत नाही. या किंमती अमेरिकेत ठरवल्या जातात. त्यामुळे आपल्याला सरकारला दोष देऊ नये, असं दानवे म्हणाले.

ऑस्ट्रेलियाचा 'हसन अली', मोक्याच्या क्षणी हातातून सोडला 'वर्ल्ड कप', VIDEO

गुंठेवारीमध्ये धमकावण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री आले त्यांनी स्थगिती दिली. लोकांना धाक दाखवायचा आणि स्थगिती देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगायचं.  संभाजीनगरची जनता इतकी भोळी नाही. तुमच्यात दम असेल तर एक झोपडी पाडून दाखवा, भाजप एकही झोपडी पाडू देणार नाही,  असा इशाराच  दानवेंनी शिवसेनेला दिला.

First published: