जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 1 लाखांचं डाळिंब चोरीला, चोरांचा प्रताप पाहून शेतकऱ्यानं लावला डोक्याला हात

1 लाखांचं डाळिंब चोरीला, चोरांचा प्रताप पाहून शेतकऱ्यानं लावला डोक्याला हात

1 लाखांचं डाळिंब चोरीला

1 लाखांचं डाळिंब चोरीला

नेक ठिकाणी चोरीच्या घटना घडतात. कधी पैसै दागिन्यांची चोरी होते तर कधी वस्तू, पिकांच्याही चोरीच्या घटना समोर येतात. अशीच एक चोरीची घटना चाळीसगाव तालुक्यातून समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदुरकर, जळगाव, 28 जुलै: अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडतात. कधी पैसै दागिन्यांची चोरी होते तर कधी वस्तू, पिकांच्याही चोरीच्या घटना समोर येतात. अशीच एक चोरीची घटना चाळीसगाव तालुक्यातून समोर आली आहे. चोरट्यांनी चक्क एक लाखाचे डाळिंब शेतातून चोरले. हातातोंडाशी आलेला घास चोरी गेल्यानं शेतकरी हतबल झाला आहे. चाळीसगाव तालुक्यातील लोंढे शिवारातून चोरट्यांनी शेतातून झाडावरील 12 क्विंटल डाळींब तोडून चोरून नेली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. चोरी गेलेल्या डाळींबाची किंमत सुमारे 1 लाख रूपये आहे. हातातोंडाशी आलेला घास अशा प्रकारे चोरट्यांनी हिरावून नेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शेतापर्यंत चारचाकी वाहन नेत डाळींची चोरी केली.

News18लोकमत
News18लोकमत

लोंढे येथील शिवाजी नीळकंठ पाटील यांचे लोंढे शिवारात शेत आहे. त्यांनी एक एकर क्षेत्रात डाळींब फळबागची लागवड केली होती. योग्य नियोजन केल्याने डाळींब परिपक्व होवून काढणीला आली होती. त्यामुळे चांगले उत्पन्न येईल या आनंदात ते होते. शिवाजी पाटील हे शनिवारी गुजरात येथे काही कामानिमित्त गेले होते. गुरूवारी सायंकाळी ते घरी परतले. ते नेहमीप्रमाणे शेतात गेले असता शेतातील झाडांवरील 12 क्विंटल डाळींब तोडलेले आढळून आले. या प्रकाराने शेतकऱ्याला जबर धक्का बसला. VIDEO : पूराच्या पाण्यात झाडावर अडकली व्यक्ती, 8 तासांनंतर केलं रेस्क्यू दरम्यान, चोरटे चार ते पाच जण असावे, असा संशय आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. दिवसभर राबून शेतकरी घरी जातात. तसेच या परिसरात बिबट्याची दहशत असल्यानं शेतात रात्री कोणी नसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: jalgaon , theft
  • First Published :
जाहिरात
जाहिरात