Home /News /maharashtra /

भिकाऱ्याची आयुष्यभराची कमाई पोलिसांमुळे वाचली, चोरट्याकडून तासाभरात परत मिळवले पावणे 2 लाख

भिकाऱ्याची आयुष्यभराची कमाई पोलिसांमुळे वाचली, चोरट्याकडून तासाभरात परत मिळवले पावणे 2 लाख

Crime in Beed: बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ याठिकाणाहून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या कमाई चोरट्यांनी डल्ला मारला (steals beggars lifetime earnings) होता.

    परळी, 25 मे: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) झपाट्यानं वाढत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) अत्यंत घातक ठरत असून अनेकजण याच्या कचाट्यात सापडत आहेत. त्यामुळे सरकारनं राज्यभर लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे. परिणामी राज्यातील सर्व दुकाने, शाळा, व्यवसाय, मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. याचा अत्यंत वाईट परिणाम मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची (beggars struggling for meal) झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांना कित्येक दिवस उपाशीपोटी झोपावं लागत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ याठिकाणाहून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या कमाई चोरट्यांनी डल्ला मारला (steals beggars lifetime earnings) होता. मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीनं चोरट्याला पकडलं असून संबंधित निराधार भिकाऱ्याची रक्कम परत मिळवून दिली आहे. भिकाऱ्याची चोरीला गेलेली रक्कम परत मिळाल्यानंतर त्याला आपल्या अश्रूंचा बांध आवरता आला नाही. हे वाचा-संपूर्ण तारुण्य अंधारात गेलं; साठीच्या उंबरठ्यावर मिळाली विशीत गेलेली 'दृष्टी' संबंधित भिकारी व्यक्तीचं नाव बाबुराव नाईकवाडे असून ते गेल्या बऱ्याच वर्षापासून परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. नाईकवाडे यांनी पै पै करत 1 लाख 72 हजार रुपयांची रक्कम साठवली होती. त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईवर कोणीतरी पाळत ठेवून डल्ला मारला होता. आयुष्यभर पोटाला चिमटा काढून साठवलेले पैसे अचानक कोणीतरी चोरल्यानं नाईकवाडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. यानंतर हवालदिल झालेल्या नाईकवाडे यांनी परळी पोलिसांकडे मदत मागितली. हे वाचा-AC चा वापर ठरू शकतो घातक; जाणून घ्या आरोग्यावर होणारे 8 गंभीर दुष्परिणाम या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परळी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत, नाईकवाडे यांची 1 लाख 72 हजार रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे. राज्यातील लॉकडाऊन आणि बंद असणारी मंदिरे यामुळे आधीच संकटात सापडलेल्या नाईकवाडे यांच्यासाठी पोलीस देवदूतचं ठरले आहेत. त्यांनी अवघ्या तासभरात चोरट्याच्या मुसक्या आवळून त्याचाकडून चोरलेली रक्कम परत मिळवली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed news, Crime news, Theft

    पुढील बातम्या