मुंबई, 05 जुलै: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर मोठं भाष्य केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या (Assembly Session) पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याच दरम्यान फडणवीसांना भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले, भाजप (Bharatiya Janata Party) आणि सत्ताधारी शिवसेनेत (Shiv Sena) काही मुद्द्यांवरुन मतभेद आहेत. पण ते शत्रू नाहीत. परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात. शिवसेनेसोबत काही मतभेद असतील पण आम्ही शत्रू नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेनेशी युती होण्याची शक्यता ही नाकारली नाही.
There are no ifs and buts in politics. There might be some differences with Shiv Sena but we are not enemies: Former Maharashtra CM & LoP Devendra Fadnavis on being asked about possibilities of BJP allying with Shiv Sena, in Mumbai pic.twitter.com/0j5x2D7mra
— ANI (@ANI) July 4, 2021
पुढे फडणवीस म्हणाले, आम्ही (शिवसेना आणि भाजप) कधीच शत्रू नव्हतो. ते आमचे मित्र आणि जे लोक होते ज्यांच्याविरूद्ध त्यांनी निवडणूक लढली. त्यांनी त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केले आणि त्यांनी आम्हाला सोडले. राजकारणात जर आणि तर नाही. हेही वाचा- आजपासून कोल्हापूर शहरातील सर्व दुकानं सुरू होणार यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारवर टीकेची झोडही उठवली आहे. राज्यातील प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी सरकार अधिवेशनाचा काळ कमी करत असल्याचं ते म्हणाले. सरकार लोकशाहीला कुलूप लावण्याचा (Locking the democracy) प्रयत्न करत असल्याची टीका करताना सभागृहात बोलू दिलं नाही, तर आम्ही माध्यमांसमोर, रस्त्यावर येऊन आणि जनतेत जाऊन आमचं म्हणणं मांडू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.