‘हिट विकेट म्हणतात याला’; आदित्य ठाकरेंच्या पोस्टनंतर नितेश राणेंची शेरेबाजी

‘हिट विकेट म्हणतात याला’; आदित्य ठाकरेंच्या पोस्टनंतर नितेश राणेंची शेरेबाजी

नितेश राणे यावेळी शिवसेनेने आपल्यावर केलेल्या आरोपाची आठवण करुन दिली. पोस्टच्या शेवटी कर्मा असं लिहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 ऑगस्ट : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आता अनेक राजकीय व्यक्तींकडून प्रतिक्रिया दिली जात असल्याचे दिसून येत आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात एकीकडे बिहार आणि मुंबई पोलिसांमध्ये सुरू असलेल्या वादानंतर आता शिवसेना – भाजप आमनेसामने आल्याचे चित्र आहे.

आज भाजप नेते नारायण राणे यांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले. शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणात आल्यानंतर अधिक चर्चा सुरू आहे. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे.

यामध्ये त्यांनी हे गलिच्छ राजकारण आहे, पण मी संयम बाळगलाय असं वक्तव्य केलं आहे. यानंतर आता नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची पोस्ट शेअर करीत हे Hit Wicket बोलतात याला अशी शेरेबाजी केली आहे. यावेळी नितेश राणे यांनी यापूर्वी त्यांच्यावर केलेल्या आरोपाची आठवण करुन दिली. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आदित्य ठाकरे डर्टी पॉलिटिक्सबद्दल बोलत आहे. त्यांच्या पक्षाने माझ्यावर किती आरोप केले होते, असं म्हणत त्यांनी पोस्टच्या शेवटी कर्मा असं लिहिलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 4, 2020, 8:39 PM IST

ताज्या बातम्या