धुळे, 13 ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाल परीकडून धक्का मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसटीची भाडेवाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी भाडेवाढीचे संकेत दिले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 10 टक्के नैसर्गिक भाडेवाढ केली जाणार असल्याचे चन्ने यांनी स्पष्ट केलं. लवकरच बैठकीत चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय महामंडळ 700 नव्या बसेस खरेदी करणार आहे. राज्याच्या ताफ्यात नव्या अत्याधुनिक 700 बसेस दाखल होणार आहेत. येत्या महिण्यात नव्या बसेस दाखल होणार आहेत. याशिवा महामंडळ 500 बसेस कराराने घेणार आहे. 12 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या धावत्या बसने घेतला पेट; संपूर्ण बस जळून खाक, औरंगाबादेतील घटनेचा VIDEO डिझेल बसेसवरून इलेक्ट्रिक बसकडे आत्ता महामंडळाचा कल असेल. GPS च्या धर्तीवर एसटीबसमध्ये VTS प्रणाली बसवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.