जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जे घरं कष्टाने उभं केलं, त्याच घरात पायरीमुळे तरुणाने गमावला जीव, भंडाऱ्यातील मन सुन्न करणारी घटना

जे घरं कष्टाने उभं केलं, त्याच घरात पायरीमुळे तरुणाने गमावला जीव, भंडाऱ्यातील मन सुन्न करणारी घटना

जे घरं कष्टाने उभं केलं, त्याच घरात पायरीमुळे तरुणाने गमावला जीव, भंडाऱ्यातील मन सुन्न करणारी घटना

नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 11 एप्रिल : घरातच पायरीवरून पाय घसरुन डोक्याला जबर मार लागलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भंडारा (bhndara) जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडली आहे. या तरुणाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाळा (कवडसी) इथं ही घटना घडली आहे. शरद यादवराव बुरडे (वय 38 ) असं मृत तरुणाचे नाव आहे. शरद हा शेतकरी होता, त्याने अथक प्रयत्नाने पक्के घर बांधले होते. मात्र हे पक्के घरच मृत्यूस कारणीभूत ठरले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 11 एप्रिल :  घरातच पायरीवरून पाय घसरुन डोक्याला जबर मार लागलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भंडारा (bhndara) जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडली आहे. या तरुणाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाळा (कवडसी) इथं ही घटना घडली आहे.  शरद यादवराव बुरडे (वय 38 ) असं मृत तरुणाचे नाव आहे. शरद हा शेतकरी होता, त्याने अथक प्रयत्नाने पक्के घर बांधले होते. मात्र हे पक्के घरच मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. रविवारी रात्री घरात सहजतेने चालताना शरद बुरडे यांचा पायरीवरून पाय घसरला आणि जोरात ते खाली आपटले. त्यावेळी नेमकं डोक्याला जबर मार लागला. डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर मेंदूला दुखापत झाल्याची माहिती निष्पन्न झाली ( MI च्या बेबी एबीची अशी आहे love story, गर्लफ्रेंडने वेधले सर्वांचे लक्ष) शरद बुरडे यांना उपचाराकरिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. शरदच्या अकाली निधनाने जेवणाळा (कवडसी) गावात हळहळ व्यक्त होत आहे. नैराश्यातून गळफास घेऊन नव्या घरात तरुणाने केली आत्महत्या दरम्यान, भंडारा जिल्ह्यात नैराश्यातून 37 वर्षीय इसमाने नुकत्याच बांधलेल्या घरी गळफांस घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील कोलारी येथे घडली आहे. मारुती काळे असे मृतकाचे नाव आहे. मारूतीच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. ( मुलाच्या मृत्यूनंतर 2महिन्यातच अभिनेत्याचं निधन,2 Statesमध्ये गाजवली होती भूमिका ) मारुती दिवसभर सर्व काम केल्यानंतर सायंकाळ घरी गेला. घरी कोणी नसताना घराच्या छताला नायलॉन दोरी लावून गळफास घेतला. नुकतेच त्यांनी प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत घराचे बांधकाम केले असून काही दिवसानंतर ते घरीगृह प्रवेश सुद्धा करणार होते. त्याआधीच त्याच नविन घराच्या छताला त्याने नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मारूती  आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यांचा बकरी पालनाचा व्यवसाय होता, त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र त्याने अचानक आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून अधिक तपास पालांदूर पोलीस करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात