Home /News /maharashtra /

4 दिवस कडाक्याच्या थंडीत बाळाला सोडून देणारी आई अखेर आली समोर, मुलीची अवस्था पाहून ढसाढसा रडली

4 दिवस कडाक्याच्या थंडीत बाळाला सोडून देणारी आई अखेर आली समोर, मुलीची अवस्था पाहून ढसाढसा रडली

पांगरी येथील पुलाजवळ चार दिवसापूर्वी एक वर्षाची मुलगी निर्जनस्‍थळी सापडली होती.

पांगरी येथील पुलाजवळ चार दिवसापूर्वी एक वर्षाची मुलगी निर्जनस्‍थळी सापडली होती.

पांगरी येथील पुलाजवळ चार दिवसापूर्वी एक वर्षाची मुलगी निर्जनस्‍थळी सापडली होती.

रत्नागिरी, 29 जानेवारी : रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पर्‍याजवळ पुलाखाली एक वर्षाची बालिका रडताना सापडली होती. त्याबाबत पोलिसांनी सोशल मीडियावर बालिकेचा फोटो टाकून माहिती देण्याचे आवाहन केले होते. मुलीचा फोटो तिच्या आईपर्यंत पोहोचला आणि मुलीची अवस्था पाहून ती स्वतः देवरूख पोलीस स्थानकात (police station) हजर झाली. चार दिवसांपूर्वी पांगारी येथील एका पुलाखाली चार वर्षांची चिमुरडी सापडली होती. ही चिमुरडी गेल्या चार दिवसांपासून थंडीच्या कडाक्यात इथंच होती. चार दिवसांपासून रडत असल्यामुळे तिचा आवाज सुद्धा निघत नव्हता. सुदैवाने ही चिमुरडी स्थानिकांच्या लक्षात आली आणि तिला पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात हलवलं होतं. आता या चिमुरड्या मुलीला पुलाखाली सोडून देणारी आई आता समोर आली आहे. सांची स्वरूप कांबळे (वय 26 राहणार कुवारबाव बाजारपेठ, रत्नागिरी) आणि मिथिलेश उर्फ निलेश मदन डांगे (वय 23, डांगेवाडी हातखंबा, रत्नागिरी) या दोघांना ताब्यात घेतले आहे, सांची हिला पहिला मुलगा असून दुसरी मुलगी झाली नवरा दारूच्या आहारी गेला होता. त्यात मुलीची जबाबदारी पडल्याने तिला ती नकोशी झाली होती. त्यानंतर तिने मिथिलेश यांच्या साथीने या मुलीला संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे एका पुलाखाली निर्जनस्थळी सोडले होते. या प्रकरणी पोलिसांनी हातखंबा येथून तरुणाला ताब्यात घेतले होते. मात्र, तिने मुलीला तिथे का ठेवले, याचे कारण कळू शकले नाही, याचा शोध पोलीस घेत आहेत. (Multibagger Share : 39 रुपयांच्या शेअरची कमाल, 1 लाखांची गुंतवणूक बनली 70 लाख) पांगरी येथील पुलाजवळ चार दिवसापूर्वी एक वर्षाची मुलगी निर्जनस्‍थळी सापडली होती. चार दिवस थंडीत राहिल्यामुळे  तिचा आवाजही बसला होता. तेथील ग्रामस्थांनी तिला शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पोलीस प्रशासनाकडून या मुलीच्या आईचा शोध सुरू होता. त्याच बरोबर पोलिसांनी सोशल मीडियावर तिचा फोटो व तिच्याबद्दलची माहिती टाकली होती. जर कोणाला या मुली विषयी किंवा तिच्या घरच्या विषयी माहिती असल्यास तात्काळ देवरुख पोलीस कंट्रोल रूम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट या मुलीच्या आई पर्यंत पोहचली. फोटोतील मुलीची अवस्था पाहून तिला पाझर फुटला. अखेर शुक्रवारी देवरूख पोलीस स्थानकात स्वतःहून हजर झाली. (Video :विद्यापीठाच्या गेटवरच जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची घेतली शाळा) दरम्यान, निर्जनस्थळी सापडलेल्या मुलीला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलीला पाहून रुग्णालयातील कर्मचारी गहिवरले  तिला कवटाळून तातडीने उपचार केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार सुरू केले. या मुलीची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या