डोंबिवलीत शिवरायांच्या पुतळ्याजवळ आढळला सर्वात विषारी साप, VIDEO

'अत्यंत आक्रमक जातीचा मण्यार साप हा भारतातील सर्वांत चार विषारी सापांपैकी एक आहे. हा साप कोब्रा आणि पायथॉनपेक्षाही अधिक विषारी आणि धोकादायक आहे'

'अत्यंत आक्रमक जातीचा मण्यार साप हा भारतातील सर्वांत चार विषारी सापांपैकी एक आहे. हा साप कोब्रा आणि पायथॉनपेक्षाही अधिक विषारी आणि धोकादायक आहे'

  • Share this:
डोंबिवली, 02 नोव्हेंबर : डोंबिवली  (Dombivali) पूर्वेकडे मानपाडा रोडला (Manpada Road) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ संजीत वायंगणकर यांच्या स्टॉलजवळ विषारी जातीचा साप (manyar snake)आढळून आला.  शहरी भागात हा साप आढळून आल्याने परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अचानक अवरतलेल्या या सापाला पाहून व्यापाऱ्यांसह पादचाऱ्यांचीही घाबरगुंडी उडाली होती. शिवरायांच्या या पुतळ्याजवळ काही प्रमाणात झाडे आहेत. त्यामुळे या ठिकाणी छोटे पक्षी, पाली, सरडे, उंदरांचेही वास्तव्य आहे. हा साप अचानक या भागात वळवळताना आढळून आल्यानंतर स्टॉलधारक संजीत वायंगणकर यांनी तात्काळ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व सर्पमित्र सौरभ मुळे यांना कळविले. सर्पमित्र मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सापाला पकडले. त्यानंतर  कल्याण-डोंबिवलीच्या वनविभागाला कळविल्यानंतर 24 तासांच्या आत हा साप घनदाट जंगलात सोडला जाईल, असं मुळे यांनी सांगितलं. या सापाचे नाव कॉमनक्रेट (मण्यार) आहे. अत्यंत आक्रमक जातीचा मण्यार साप हा भारतातील सर्वांत चार विषारी सापांपैकी एक आहे. हा साप कोब्रा आणि पायथॉनपेक्षाही अधिक विषारी आणि धोकादायक आहे, अशी माहिती वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे सचिव सुहास पवार यांनी दिली. विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर पवार पुढे म्हणाले की, हे साप रात्रीचे असतात. म्हणजेच रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. त्याचे रक्त थंड आहे, म्हणून ते उबदार ठिकाण शोधत असतात. जेणेकरून हे साप आपले रक्त उबदार ठेऊ शकतात. खेड्यांमधील लोक जमिनीवर झोपतात. अंगावर ओढण्यासाठी ते चादर किंवा कांबळीचा वापर करतात. अशावेळी जर त्या व्यक्तीनेही आपली बाजू (कुस) बदलली तर हा साप त्या व्यक्तीला दंश करतो. एखाद्या व्यक्तीस मच्छर चावल्यासारखे वाटते, कारण या सापाचे दात खूपच लहान असतात. विष संपूर्ण शरीरात हळूहळू पसरते आणि सकाळी त्या व्यक्तीचा झोपेतच मृत्यू होतो. म्हणून या सापाच्या दंशामुळे मनुष्य सकाळचा सूर्य पाहू शकत नाही. सुहास पवार पुढे म्हणाले की, 'हाजीमलंगच्या जंगलात अजगर साप मोठ्या प्रमाणात आढळतात. पण डोंबिवलीच्या टेकड्यांमध्ये मण्यार मोठ्या संख्येने आढळतात. गेल्या अनेक वर्षात डोंबिवली एमआयडीसीच्या कॅम्पसमध्ये  मण्यार साप आढळले आहेत. सर्वात विषारी सापांपैकी मण्यार सापाला लहान दात आहेत. हे कमी प्रमाणात अधिक नुकसान करते. पट्टेरी मण्यार अतिशय विषारी असून त्याचे विष नागाच्या विषापेक्षा तब्बल सोळा पटींनी जास्त जहाल असते. हा साप बराच मोठा व दिसायला सुबक असतो. लांबी सुमारे 170 सेंमी किंवा त्याहूनही जास्त असते. शरीरावर एकाआड एक असे काळे व पिवळे पट्टे असतात. प्रत्येक पट्ट्याची (दोन्ही प्रकारच्या) रुंदी सरासरी 5 सेंमी. असते. मानेवर एक काळीखूण असून ती डोळ्यापर्यंत पसरलेली असते. एकनाथ खडसेंची भाजपवर पहिली 'सर्जिकल स्ट्राईक', 60 जण राष्ट्रवादीत दाखल कधीकधी टोक्याच्या मध्यावर काळे टिपके असतात. शरीराच्या वरच्या पृष्ठावर मधोमध एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत गेलेला एक वरंबा (उंचवटा) असून त्याच्यावर मोठ्या षट्कोणी खवल्यांची ओळ असते. शेपटाचे टोक जाड व बोटके असते. इतर साप खाऊन हा आपली उपजीविका करतो. पण बेडूक, उंदीर, सरडेही खातो. या सापात विषाच्या 0.2 मात्रेच्या प्रमाणात 10 माणसांना मारण्याची क्षमता असल्याची माहिती वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे सचिव सुहास पवार यांनी दिली.
Published by:sachin Salve
First published: