मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /खेळता खेळता मुलगा बसमध्ये जाऊन बसला, आई-वडिलांनी घेतला शोध आणि...

खेळता खेळता मुलगा बसमध्ये जाऊन बसला, आई-वडिलांनी घेतला शोध आणि...

कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील गजानन चव्हाण आणि त्यांची पत्नी मंगरुळपीर आगारात लाठी येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत होते.

कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील गजानन चव्हाण आणि त्यांची पत्नी मंगरुळपीर आगारात लाठी येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत होते.

कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील गजानन चव्हाण आणि त्यांची पत्नी मंगरुळपीर आगारात लाठी येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत होते.

 किशोर गोमाशे,प्रतिनिधी

वाशिम, 05 ऑक्टोबर : लहान मुलं खेळत असताना त्यांच्यावर जर लक्ष ठेवणे गरजेचं असतं. पण, बऱ्याच वेळा दुर्लक्ष झाल्यामुळे याची मोठी किंमत आई-वडिलांना चुकवण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. वाशिममध्ये (washim) बस स्थानकावर (st bus stand) एक लहान चिमुरडा खेळता खेळता बसमध्ये जाऊन बसला आणि बस निघून गेली. पण, सुदैवाने वाहकाच्या सतर्कतेमुळे हा चिमुरडा दोन तासांच्या प्रवासानंतर आई-वडिलांना पुन्हा भेटू शकला.

कारंजा (karanja washim)  तालुक्यातील काजळेश्वर येथील गजानन चव्हाण आणि त्यांची पत्नी मंगरुळपीर आगारात लाठी येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा वीर गजानन चव्हाण (03 ) हा फलाटावर खेळत खेळत कारंजा आगाराच्या एमएच-06 एक्यू-9420 क्रमांकाच्या वाशिमकडे जाणाऱ्या बसमध्ये चढला. तो बसमध्ये सर्वात मागच्या सीटवर जाऊन बसला. ही बाब त्याच्या मातापित्याच्या लक्षात येण्यापूर्वीच बस वाशिमकडे रवाना झाली.

किरीट सोमय्यांच्या बारामती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया

बसमधील वाहक गायत्री डोंगरे आणि चालक एस. एम.खानबरड यांनाही बसमध्ये मुलगा चढल्याचं दिसलं नव्हतं. बस धावू लागल्यानंतर वीर चव्हाणला त्याचे आई-वडील दिसले नाही. त्यामुळे तो अस्वस्थ झाला.बस मंगरुळपिर तालुक्यातील धानोरा खुर्द येथे थांबल्यानंतर तो रडत रडत खाली उतरत असतांना वाहक गायत्री डोंगरे यांच्या मनात शंका आली. त्यांनी वीरबाबत प्रवाशांकडे चौकशी केली. त्यावेळी खाली उतरणाऱ्या आणि बसमधील प्रवाशांनीही तो आपल्यासोबत नसल्याचं सांगितलं.

गायत्री यांनी विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव वीर असल्याचे सांगितलं. त्यामुळे गायत्री चव्हाण यांनी त्याला सोबतच ठेवलं. पोलिसांना याची कल्पना देण्याचा त्यांचा विचार होता. दरम्यान, मुलगा न दिसल्याने वीरचे मातापिता घाबरले आणि त्यांनी चौकशी कक्षात धाव घेत माहिती दिली. काही वेळानेच गायत्री डोंगरे यांनाही ही माहिती मिळाली आणि त्यांनी मंगरुळपीर बसस्थानकावर वीर चव्हाण ला पुन्हा त्याच्या मातापित्याच्या हवाली केले.

Janhit mein jaari च्या सेटवर Nushrratt bharuccha जखमी; फिल्मचं शूटिंग थांबवलं

काजळेश्वर येथील गजानन चव्हाण यांनी त्यांचा तीन वर्षीय मुलगा हरविल्याची माहिती मंगरुळपीर बसस्थानकातील नियंत्रण कक्षात देताच आगारातील सहाय्यक वाहतूक अधिकारी गोपाल झळके यांच्यासह देवकुमार खिराडे, डुकरे आणि आशिफ खान या एसटी कर्मचाऱ्यांनी तासाभराच्या कालावधित बसस्थानकातून गेलेल्या सर्व बसचालक आणि वाहकांकडे चौकशी करून वीरला शोधण्यासाठी महत्वाचे सहकार्य केल्यानं अवघा तीन वर्षांचा चिमुकला त्याच्या आई वडिलांना  मिळाला. एसटी वाहक गायत्री डोंगरे आणि मंगरुळपिर आगारातील कर्मचाऱ्यांची सतर्कता हरविलेल्या मुलाला त्याच्या आई वडिलांना मिळवून देण्यास कारणीभूत ठरली.

First published:
top videos

    Tags: St bus, Washim