समुद्राशी नागपूरचा काही संबंध नाही, पण फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल, शरद पवारांची टोलेबाजी

समुद्राशी नागपूरचा काही संबंध नाही, पण फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल, शरद पवारांची टोलेबाजी

निसर्ग चक्रीवादळात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, घरांचंही फार मोठं नुकसान झालं आहे.

  • Share this:

शिवाजी गोरे (प्रतिनिधी)

दापोली (रत्नागिरी), 10 जून: निसर्ग चक्रीवादळात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, घरांचंही फार मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेकांचं स्थलांतर करावं लागेल, अशी स्थिती आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना चांगल्याप्रकारची घरं कशी देता येतील, याबाबत राज्य आणि केंद्र सरकारला विचार करावा लागेल, असं कोकण दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा.. 'राज्यपालांना ऑक्सफर्डपेक्षा जास्त ज्ञान असेल' परीक्षांच्या निर्णयावरून शरद पवारांचा सणसणीत टोला

शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरुन सणसणीत टोलाही लगावला आहे. फडणवीस दौऱ्यावर येत आहेत हे चांगलं आहे, सर्वाना कळलं पाहिजे किती नुकसान झालं आहे ते. प्रत्येकजण वेगवेगळ्या भागातून येतो. मी दुष्काळी भागातून येतो, ते नागपुरातुन येतील. समुद्राचा आणि नागपूरचा तसा काही संबंध नाही. पण त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात भर पडेल, असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार हे काल आणि आज असे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. रायगडनंतर आज त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. वादळग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे या परिस्थितीत या व्यक्तीला उभं करण्यासाठी अधिक अर्थसाहाय्यची गरज आहे. त्यासाठी निकष बदलणं आवश्यक आहे, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा.. .निसर्ग चक्रीवादळग्रस्त कुटुंबांना नियमांपेक्षा वाढीव मदत मिळणार, सरकारचा निर्णय

कोकणातील नुकसानीची सर्व स्थिती उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत मांडणार असल्याची माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली. आजच आपल्याला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, आणि उद्या तातडीने या नुकसानीबाबतच्या बैठकीसाठी मुंबईला बोलावलं असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. कोकणवासीयांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस भूमिका आम्ही सर्व जण त्या ठिकाणी घेणार आहोत, अशी माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

First published: June 10, 2020, 9:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading