जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू ठार, भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू ठार, भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी

मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथं भोकरमार्गे टाटा मॅजीक गाडीने जात होते.

मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथं भोकरमार्गे टाटा मॅजीक गाडीने जात होते.

मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथं भोकरमार्गे टाटा मॅजीक गाडीने जात होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोकर, 21 फेब्रुवारी : नांदेड  (nanded) जिल्ह्यातील भोकरमध्ये (bhokar) मन हेलावून टाकणाऱ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. भोकर-किनवट रस्त्यावर एका प्रवासी वाहतूक गाडीचा आणि ट्रकचा (truck accident) अपघात झाला आहे. या अपघातात नववधूसह 5 जण ठार झाले आहे. तर सहा जण जखमी आहे. जखमीमध्ये नवरदेवाचा समावेश आहे. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोकर ते किनवट रस्त्यावरील सोमठाणा पाटीजवळ आज संध्याकाळी हा अपघात झाला. जारीकोट तालुका धर्माबाद इथं राहणारा नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांचा उमरखेड येथील पूजा तामलवाड यांच्याशी १९ फेब्रुवारी रोजी विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर आज मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथं भोकरमार्गे मॅजीक गाडीने जात होते. भोकर येथील सोमठाणा पाटीजवळ गाडी पोहोचली असता ट्रकने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, टाटा मॅजीक वाहनाचा चुराडा झाला. गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नवरी पुजा ज्ञानेश्वर पामलवाड (वय २०), माधव पुरभाजी सोपेवाड (वय ३०), दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड (वय २२), सुनील दिगंबर थोटे (वय ३०) यांच्यासह आणखी एकाचा तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसंच सहा जण गंभीर जखमी झाले आहे. यामध्ये नवदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांचा समावेश आहे.  सुनीता अविनाश टोकलवार (वय ४० वर्ष), गौरी माधव चोपलवाड (वय दीड वर्ष ) अविनाश संतोष टोकलवार (वय ३६ वर्षे), अभिनंदन मधुकर कसबे (वय १२) अशी जखमींची नाव आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात