जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वडील सोडून गेले, सांभाळणाऱ्या मामालाही कोरोनानं हिरावलं, अखेर 6 व्या प्रयत्नात भावना झाली IAS

वडील सोडून गेले, सांभाळणाऱ्या मामालाही कोरोनानं हिरावलं, अखेर 6 व्या प्रयत्नात भावना झाली IAS

वडील सोडून गेले, सांभाळणाऱ्या मामालाही कोरोनानं हिरावलं, अखेर 6 व्या प्रयत्नात भावना झाली IAS

UPSC Success Story : सोलापूरच्या भावना यांनी विपरित परिस्थितीवर मात कर IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 24 मे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि खडतर परीक्षांमध्ये युपीएससीचा समावेश होतो. या परीक्षेला बसलेल्या काही लाख तरूणांपैकी 933 जणांनी यंदा यश मिळवलंय. सोलापूरमध्ये मध्य रेल्वे विभागात असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या भावना एच.एस. यांनी या परीक्षेत 55 वा क्रमांक मिळवलाय. सहाव्या प्रयत्नात IAS कर्नाटक केडरच्या भावना यांना हे यश सहज मिळालेलं नाही. भावना यांनी तब्बल सहाव्या प्रयत्नात IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. भावना या मुळच्या बेंगलुरूच्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरचं त्यांचं शिक्षण झालंय. त्यानंतर 2015 पासून त्या यूपीएससीची अभ्यास करतायत.

News18लोकमत
News18लोकमत

घरची बेताची परिस्थिती त्यातच लहाणपणी वडिलांचं निधन झालं. त्यानंतर भावनचा यांचा आई आणि मामानं सांभाळ केला. कोरोना व्हायरसनं दोन वर्षांपूर्वी मामाचंही निधन झालं. त्यानंतरही त्यांनी अभ्यासावरील फोकस कायम ठेवत हे यश मिळवलंय. यूपीएससीचा अभ्यास करताना आईनं मला मोलाची साथ दिली. या यशाचं श्रेय आईला असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजी विकून वडिलांनी शिकवलं, आज लेकाने UPSC पास करून दाखवलं भावना यापूर्वी 2018 साली यूपीएससीमध्ये उत्तीर्ण झाल्या. त्यावेळी त्यांची इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसमध्ये निवड झाली. याच सर्व्हिसच्या अंतर्गत त्या सध्या सोलापूरमध्ये काम करत आहेत. 2019 साली मुलाखतीमध्ये अपयश आल्यानंतर 2020 साली त्या मुख्य परीक्षा देखील उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. पण, अखेर यावर्षी त्यांनी मोठ्या जिद्दीनं यश खेचून आणलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात