भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी ठाणे, 18 मे : शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे ठिकाण. शिक्षणाबरोबरच आठवणींचा तो एक हळवा कप्पा. परिस्थितीमुळे मात्र काही जणांच्या नशिबात शाळा हा शब्दचं अनोळखी असतो. सिग्नलवर गजरे विकता विकता आपण आपल्या आयुष्यातील काहीतरी महत्त्वाचं गमावत आहोत याची त्यांना कल्पना नसते. पण, या मुलांनाही काहीतरी करण्याची जिद्द असते. फक्त त्यांना तशी संधी मिळणं आवश्यक असते. हे ओळखूनच ठाण्यातील भटू सावंत यांनी ठाणे महापालिकेच्या मदतीनं नवा उपक्रम सुरू केलाय. काय आहे उपक्रम ? भटक्या विमुक्त जमातीमधील पारधी ही एक जमात आहे. सामान्य मुलांच्या शाळेत यांची भाषा कळणे अवघड आहे. त्यामुळे त्यांची भाषा समजून घेऊन त्यांना शिक्षण द्यावं लागेल हे भटू सावंत यांच्या लक्षात आले. ठाण्यातील सिग्नलवर वस्तू आणि गजरे विकणाऱ्या मुलांसाठी त्यांनी तीनहात नाक्यावरील सिग्नल जवळच्या कंटेनरमध्ये ही शाळा सुरू केली.
सकाळी ठाण्यातील सिग्नलवर जाऊन सर्व मुलांना बसने शाळेत आणले जाते. शाळेत आल्यानंतर सर्वात पहिले त्यांना ब्रश करून आंघोळ करायला सांगितले जाते. रोज धुतलेले ड्रेस त्यांना घालायला दिले जातात. त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी एक कपाट केले आहे. त्यानंतर सामान्य मुलांसारखी त्यांची शाळा सुरू होते. पौष्टीक नाश्ता, जेवण या सर्व गोष्टी शाळेत दिल्या जातात. याचबरोबर त्यांचा कला कृतीला वाव मिळेल अशा पद्धतीने सर्व गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. सिग्नल शाळेतील मुलांचं यश सिग्नल शाळेतील पाच जण दहावी पास होऊन बाहेर पडलेत. त्यापैकी 3 जण इंजिनियर असून एक विद्यार्थी पोलीस अकादमीमध्ये आहे. तर दोन मुलांनी टेक्निकल शिक्षण घेतलंय. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर त्यांच्या स्वप्नांना नवे पंख फुटले असून ते आता नवं काही करू पाहात आहेत. 3 महिन्यांची गरोदर अन् पतीचे निधन, धुणी भांडी केली आज अग्निशमन दलात आहे मोहिनी! Video रोल मॉडल शाळा! करोडो विद्यार्थी देशभरात शाळेपासून वंचित आहेत. मात्र अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश लक्षात घेऊनच ही शाळा सुरू करण्यात आलीय. वेगवेगळ्या उपक्रमामुळे ही शाळा संपूर्ण देशात रोल मॉडेल ठरल्याची माहिती भटू सावंत यांनी दिली आहे.

)







