जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Thane News : देणाऱ्याने देत जावे, एरोस्पेसाठी काम करणारे हात घडवत आहेत विद्यार्थ्यांचे भविष्य, पाहा Video

Thane News : देणाऱ्याने देत जावे, एरोस्पेसाठी काम करणारे हात घडवत आहेत विद्यार्थ्यांचे भविष्य, पाहा Video

Thane News : देणाऱ्याने देत जावे, एरोस्पेसाठी काम करणारे हात घडवत आहेत विद्यार्थ्यांचे भविष्य, पाहा Video

सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यामध्ये सिग्नल शाळा सुरु करण्यात आलेली आहे. याशाळेत एरोस्पेसमध्ये काम करणारे सुरेंद्र वैद्य विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत आहेत.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 12 जून : सिग्नलजवळ राहणारी मुले आपण अनेकदा रस्त्यावर काहीना काही वस्तू विकताना किंवा भीक मागताना पाहिली असतील. अर्थात त्यात लहान मुलांचा देखील समावेश असतो. यामुळे या मुलाच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यामध्ये  सिग्नल शाळा सुरु करण्यात आलेली आहे. या शाळेत शिक्षणच नव्हे तर कुशल विद्यार्थी म्हणून या विद्यार्थ्यांनी शाळेतून बाहेर पडावे यासाठी समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिका काम करत आहे. या शाळेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. हे व्यावसायिक शिक्षण गोदरेज एरोस्पेस विभागाचे प्रमुख पद भूषविणारे सुरेंद्र वैद्य या मुलांना देत आहेत. अशी झाली प्रशिक्षणाची सुरुवात? डॉ. सुनिती वैद्य या होमिओपॅथी डॉक्टर होत्या. काही वर्षांनी आपण प्रॅक्टिस थांबवून समाजासाठी काही करावे असे त्यांना जाणवले. याच जाणिवेतून सिग्नल शाळेशी त्या जोडल्या गेल्या. या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर कोरोनामध्ये त्यांनी या मुलांच्या मदतीने आदिवासी पाडे, डंपिंग ग्राउंड येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा पुरविली.

News18लोकमत
News18लोकमत

या मुलांनी त्या सांगतील त्या पद्धतीने रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यानंतर त्यांनी पती सुरेंद्र वैद्य यांना देखील ब्रह्मस्त्रसाठी तुम्ही काम करतात. ती मुले खूप हुशार आहेत त्यांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होऊ द्या सांगत त्यांच्यासाठी काहीतरी सुरू करूया असे सुचविले. त्यानंतर सुरेंद्र वैद्य या उपक्रमाशी जोडले गेले. हळू हळू कामाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर डॉ. सुनिती वैद्य यांचे निधन झाल्यानंतर 7 सप्टेंबर 2022 रोजी हे काम पूर्णतः हाती घ्यायचे त्यांनी ठरवल्याचे सुरेंद्र वैद्य सांगतात. दर बुधवारी आणि शुक्रवारी ते मुलांना शिकवायला येतात. यावेळी ते स्वतः देखील अनेक कामे करत विद्यार्थ्यांना यंत्र कसे जोडायचे आणि वापरायचे याचे प्रशिक्षण देतात. अनुराधा रोडे या शाळेतील व्यावसायिक केंद्रातील समन्वयक पद सांभाळत असून त्या मुलांना थेरी शिकवतात तर मी प्रात्यक्षिक दाखवतो अशी माहिती वैद्य यांनी दिली. जापनीज पद्धतीचे तंत्रज्ञानावर माझा अभ्यास असल्याचे अनुराधा रोडे यांनी सांगितले.

Kalyan News : कल्याणची चाळ ते टीव्ही स्टार, पाहा कसा झाला चिमुरड्या हर्षदाचा प्रवास, Video

कुशल कारागीर मिळत नाहीत  एरोस्पेससाठी काम करणारे हात आता सिग्नल शाळेतल्या मुलांचे भविष्य घडवत आहेत. तांत्रिक व्यवसायात अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र कुशल कारागीर मिळत नाहीत अशी खंतही एरोस्पेससाठी काम करणाऱ्या सुरेंद्र वैद्य यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , thane
  • First Published :
जाहिरात
जाहिरात