जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Thane News : पावसाळ्यात हवाय ट्रेंडी लूक, 300 रुपयांपासून मिळेल टॅाप्स, कुठे? VIDEO

Thane News : पावसाळ्यात हवाय ट्रेंडी लूक, 300 रुपयांपासून मिळेल टॅाप्स, कुठे? VIDEO

Thane News : पावसाळ्यात हवाय ट्रेंडी लूक, 300 रुपयांपासून मिळेल टॅाप्स, कुठे? VIDEO

स्वस्तात मस्त ट्रेंडी कपडे तुम्ही ठाण्यात या ठिकाणी खरेदी करू शकतात.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

लतिका अमोल तेजाळे, प्रतिनिधी

ठाणे, 23 जून : कपडे हा महिला आणि मुलींचा अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि आवडता विषय असतो. त्यामुळे कितीही कपडे असले तरी त्यांना कपड्यांची कमतरता असते. त्यामुळे महिला आणि मुली सर्वाधिक कपडे खरेदी करण्यावर प्राधान्य देतात. त्यामुळे सध्या काय फॅशन ट्रेण्ड सुरू आहे त्यानुसार महिला आणि मुली कपडे खरेदी करतात. मग अशा वेळी शोध सुरु होतो ते स्वस्तात मस्त ट्रेंडी कपडे कुठे मिळतील याचा त्यामुळे ठाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पण स्वस्त दरामध्ये वेस्टर्न कपडे कुठे खरेदी करता येतील याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात

ठाण्याच्या जांभळीनाका मार्केटमध्ये तुम्ही वेगवगेळ्या प्रकारच्या वेस्टर्न कपड्यांची खरेदी करू शकतात. ओएमजी सेल या दुकानात 8 हजार पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे महिला आणि मुलींचे वेस्टर्न कपडे मिळतात. येथील व्यवस्थापक अमित ठक्कर हे ठाण्याच्या ब्रॅंचचे सर्व व्यवहार बघतात. ओएमजी सेलच्या ठाणे सोबतच नाशिक आणि पुणे अशा वेगवेगळ्या शहरात देखील ब्रांच आहेत. महिलांचे वेस्टर्न वेअर कपडे 300-400 रुपयात ओएमजी सेल मध्ये मिळतात.

News18लोकमत
News18लोकमत

कोणते प्रकार उपलब्ध?

ठाण्याच्या जांभळीनाका मार्केटमध्ये असलेले या दुकानात महिलांच्या वेस्टर्न वेअर कपड्यांचे अनेक व्हरायटी मिळतात. फॅन्सी टॉप्स, ट्यूनिक्स, फॉर्मल, स्लीव्हलेस, बॉटनेक, क्रोपटॉप, लाँगटॉप, ऑफ शोल्डर टॉप, विनेक टॉप, टर्टलनेक टॉप असे विविध प्रकारचे टॉप्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच बरोबर वेस्टर्न बॉटम वेअरमध्ये पेन्सिल जीन्स, शॉर्ट्स, बॅगी जीन्स, नारो जीन्स, हायवेस्ट, टोंन जीन्स, जॉगर्स, फॉरमल्स पँट असे अनेक प्रकार येथे उपलब्ध आहेत.

जाहिरात

या वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांचे वेगवेगळे साईज म्हणजेच स्मॉल, मीडियम, लार्ज आणि प्लस साईज हे देखील या दुकानात उपलब्ध आहेत. प्रत्येक टॉप आणि प्रत्येक जीन्समध्ये वेगवेगळे रंग सुद्धा या ठिकाणी आपल्या आवडीनुसार मिळतील. त्याचबरोबर परफेक्ट फिटिंग आणि साईजचे वेस्टर्न कपडे येथे स्वस्त दरात विक्री केली जाते.

Chinchwad News : शाही मस्तानी, देवसेना नऊवारी फक्त 800 रुपयांमध्ये खरेदीची मोठी संधी
जाहिरात

काय आहे किंमत?

येथे कुठलाही वेस्टर्न टॉप्स हा फक्त 300 रुपयांपासून मिळतो. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची जीन्स पँट ही फक्त 400 रुपयांपासून मिळते. उत्तम डिझाईन आणि क्वालिटी इथे मिळते, अशी माहिती ओएमज सेल या दुकानाचे व्यवस्थापक अमित ठक्कर यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात