जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chinchwad News : शाही मस्तानी, देवसेना नऊवारी फक्त 800 रुपयांमध्ये खरेदीची मोठी संधी

Chinchwad News : शाही मस्तानी, देवसेना नऊवारी फक्त 800 रुपयांमध्ये खरेदीची मोठी संधी

Chinchwad News : शाही मस्तानी, देवसेना नऊवारी फक्त 800 रुपयांमध्ये खरेदीची मोठी संधी

लग्नात मिरवायला वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी साड्या इथं फक्त 800 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी चिंचवड, 22 जून :  सणवार म्हटलं की नऊवारी साडी ओघाने आलीच. अनेक कार्यक्रमात नऊवारी नेसण्यालाच महिला पसंती देतात.  हा ट्रेंड आता बदलत असून पारंपरिक नऊवारीऐवजी नवनवीन पद्धतीने नऊवारी शिवून घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. ब्राह्मणी, पेशवाई, मयूरपंखी, शाही मस्तानी, देवसेना आणि जिजाऊ या प्रकारची नऊवारी साडी नेसून मिरवण्यात महिलांना आनंद वाटतो. नऊवारी साड्यांचे नवनवीन प्रकार पुण्याजवळच्या चिंचवडमधील बाजारपेठेत खरेदी करता येतील. सर्व वयोगटासाठी नऊवारी! चिंचवडमधील नऊवारी नार या कलादालनात तुम्ही अगदी 1 वर्षांपासूनच्या चिमुकलीपासून ते 80 वर्षांच्या आजीपर्यंत सर्वांसाठी नऊवारी साड्या खरेदी करू शकता. या साड्यांचे अनेक प्रकार बाजारात मिळतात. पण, ती नेसणं महिलांना शक्य होत नाही. त्यावर उपाय म्हणून नऊवारी शिवण्यास महिलांची पसंती असते.

News18लोकमत
News18लोकमत

या सर्व प्रकारच्या साड्या कमीत-कमी म्हणजे 800 रुपयांपासून चिंचवडच्या या कलादालनात मिळतात. ‘मागच्या वर्षी ब्राह्मणी, पेशवाई आणि मस्तानी या प्रकारच्या नऊवारी साडय़ा शिवून घेण्यास महिलांची पसंती होती. मात्र, यंदाच्या वर्षी नऊवारी साडय़ा शिवून घेण्यासाठी आणखी नवीन प्रकार आले आहेत. शाही मस्तानी, मयूरपंखी, गजरा, देवसेना, जिजाऊ, हे साडय़ांचे नवीन प्रकार शिवून घेण्याकडे सध्या महिलांचा कल मोठय़ा प्रमाणात दिसतोय,’ असं या कलादालनाच्या संचालिका चैताली भोईर यांनी सांगितलं. काय सांगता फक्त 100 रुपयांमध्ये मिळते साडी! अशी ॲाफर कुठे आहे सुरू? पाहा Video काय काळजी घ्याल? ‘तुमच्या रंगाला मॅच होईल असा नऊवारीचा रंग निवडा.  फोटोसाठी गडद रंग उठून दिसतात. नऊवारीमध्ये लाल, गुलाबी, राणीकलर, जांभळा, हिरवा, केशरी हे गडद रंग उठून दिसतात. त्याप्रमाणे साडीची खरेदी करा. साधारणपणे आपण लग्नकार्य असल्याने सोन्याचे दागिने घालतो. तेव्हा साडीचा काठ खूप मोठा असेल तर हे दागिने झाकले जाऊ शकतात. त्यामुळे साडीचा काठ आपल्या उंचीला शोभेल असा आणि लहान असेल तेवढा चांगला. त्यामुळे आपण घातलेले दागिने शोभून दिसतात. नऊवारी साडी खरेदी करताना ती खरंच नऊवार आहे की नाही हे तपासून घ्या. अनेकदा वार कमी असल्यास साडी नेसताना ती पुरत नाही आणि मग ऐनवेळी आपला गोंधळ उडू शकतो. तसेच साडीची रुंदीही आपल्या उंचीप्रमाणे योग्य आहे की नाही तपासा,’ असा सल्ला भोईर यांनी दिलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात