जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Thane News : वेगवगेळ्या ट्रेंडी टॉप्सची खरेदी करायचीय? 200 रुपयांमध्ये इथं आहे संधी, Video

Thane News : वेगवगेळ्या ट्रेंडी टॉप्सची खरेदी करायचीय? 200 रुपयांमध्ये इथं आहे संधी, Video

Thane News : वेगवगेळ्या ट्रेंडी टॉप्सची खरेदी करायचीय? 200 रुपयांमध्ये इथं आहे संधी, Video

ठाण्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला स्वस्त दरामध्ये टॉप्स वेगवगेळ्या प्रकारच्या टॉप्सची खरेदी करता येईल.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 जुलै : नवनवीन फॅशनेबल कपडे हा महिलांचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे कितीही कपडे असले तरी ते महिलांना कमीच असतात. त्यामुळे महिला सर्वाधिक कपडे खरेदी करण्यासाठी प्राधान्य देतात. सध्या ट्रेंडिंग काय सुरु आहे यावर महिलांचे विशेष लक्ष असते. मग अशा वेळी शोध सुरु होतो ते स्वस्तात मस्त ट्रेंडिंग कपडे कुठे मिळतील याचा त्यामुळे ठाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पण स्वस्त दरामध्ये टॉप्स कुठे खरेदी करता येतील याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ठाण्याच्या बी-कॅबिन परिसरात असलेले शितल कलेक्शन या दुकानात तुम्ही अगदीच स्वस्तात मस्त ट्रेंडी टॉप्स खरेदी करू शकता. येथील मालक एजाझ मलिक हे गेले 3 वर्षांपासून या ठिकाणी व्यापार करत आहेत. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजेच येथे मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट, टॉप्स,वनपीस हे फक्त 200 रुपयात उपलब्ध आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

या ठिकाणी टॉप्सच्या, वनपीसच्या अनेक स्मॉल, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज अशा साईज उपलब्ध असून त्याही फक्त 200 रुपयांत मिळतात. या ठिकाणी अगदीच सुरुवाती पासूनच 200 रुपये एवढीच किंमत आहे. कोण कोणते प्रकार उपलब्ध? ठाण्याच्या बी-कॅबिन परिसरात असलेले शितल कलेक्शन ह्या दुकानात महिलांचे अनेक वेस्टर्न वेअरच्या ट्रेंडिंग व्हरायटी उपलब्ध आहेत. फॅन्सी टॉप्स, टूनिक्स, स्लीवलेस, क्रोपटॉप्स, लाँगटॉप्स, बोटनेक, ऑफशोल्डर, कोल्डशोल्डर असे विविध प्रकारचे फॅन्सी टॉप्स या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर वेस्टर्न स्टाइल वनपीस, फ्रॉक, स्कर्ट देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. या वेगवेगळ्या कपड्यांची वेगवेगळी साईज म्हणजेच स्मॉल, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज आणि प्लस साईज हे सुद्धा या ठिकाणी सहज उपलब्ध होतात.

Thane News : पावसाळ्यात हवाय ट्रेंडी लूक, 300 रुपयांपासून मिळेल टॅाप्स, कुठे? VIDEO

किती आहे किंमत ? येथे कुठलेही वेस्टर्न टॉप्स, वनपीस, स्कर्ट हे ट्रेंडी कलेक्शन फक्त 200 रुपयांत उपलब्ध आहे. एका वेळी 5-6 कपडे एकत्र घेतल्यास या ठिकाणी त्या वर 20 सूट आहे. उत्तम डिझाइन आणि क्वालिटी इथं मिळते, अशी माहिती शीतल कलेक्शनचे मालक एजाझ मलीक यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात