कल्याण, 29 जुलै : मुंबईच्या जवळ असलेल्या कल्याण -डोंबिवली उपनगरांची लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. मुंबईत काम करणारी पण, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे तिथं स्थायिक न होऊ शकणारी लाखो मराठी कुटुंब या भागात राहतात. वाढत्या लोकसंख्येचा भार झेलणाऱ्या या परिसरातील नागरिकांचे प्रश्न हे तितकेच बिकट आहेत. अगदी शौचालयात जाण्यासाठी देखील कल्याणमधील नागरिकांना संघर्ष करावा लागतोय. शौचालयाच्या छताला लागलेली गळती, खिडक्यांची सताड उघडी दालने, तुटलेले दरवाजे अशी कल्याणमधल्या सूचक नाका परिसरातल्या भीम नगरची परिस्थिथी आहे. तुंबलेले पाणी , कधीही कोसळतील अशा स्थितीत असलेल्या भिंती यामुळे ही अवस्था आणखी भीषण झालीय.
प्रत्येक घरात शौचालय असावं यासाठी सरकार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मात्र या भागातील शौचालयाची परिस्थिती जैसे थे आहे. काही ठिकाणी तर महिला वर्गाला आडोसा शोधून नित्य काम करावी लागतात. या संदर्भात वारंवार आवाज उठवूनही परिस्थितीमध्ये काहीही बदल झाला नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी केलीय. …तर होईल चेहऱ्यावर परिणाम! ‘या’ ठिकाणी कधीच ठेवू नका मेकअपचं साहित्य या परिसरात पुरुषांसाठी 14 शौचालयं आहेत. पण प्रत्याक्षात फक्त 3 शौचालयं सुरू असून त्यांचीही अवस्था बिकट आहे. महिलांचीही केवळ दोनच शौचालयं सुरू आहेत. या अस्वच्छतेमुळे अनेकांना वारंवार डॉक्टरांकडं जावं लागतंय. या सर्व प्रश्नांवर पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा तो संपर्क होऊ शकला नाही.