जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाण्यातील गर्लफ्रेंडचा पराक्रम; भेटायला आलेल्या प्रियकरालाच लुटलं, पुढे जे केलं ते आणखीच धक्कादायक

ठाण्यातील गर्लफ्रेंडचा पराक्रम; भेटायला आलेल्या प्रियकरालाच लुटलं, पुढे जे केलं ते आणखीच धक्कादायक

गर्लफ्रेंडनेच प्रियकराला लुटलं (प्रतिकात्मक फोटो)

गर्लफ्रेंडनेच प्रियकराला लुटलं (प्रतिकात्मक फोटो)

भाविकाने त्याला भेटायला येताना आपल्यासाठी गिफ्ट आणण्यास सांगितलं होतं. ज्यात साडी, सोन्याचे झुमके, सोन्याचे पैजण आणि बांगड्या, नवीन पावसाळी शूज आणि छत्री याचा समावेश होता.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे 04 जुलै : एका 30 वर्षीय तरुणीने चार जणांसह मिळून आपल्याच प्रियकराची लाखो रुपयांची लूट केली आणि त्याला नग्नावस्थेत शहापूर महामार्गावर फेकून दिलं. पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . भाविका भोईर आणि नदीम खान अशी या प्रकरणातील दोन आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालाजी शिवभगत हा शहापूर येथील रहिवासी असून त्याचा बांधकाम व्यवसाय आहे. तो भाविका या शहापूर येथील रहिवासी असलेल्या तरुणीसोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंधात होता. 28 जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाविकाने शिवभगत यांना शहापूर येथील आटगाव महामार्गावरील एका ठिकाणी बोलावलं. हे जोडपं बोलत असतानाच तिथे भाविकाचे चार साथीदार आले. त्यांनी शिवभगतवर प्राणघातक हल्ला केला आणि दुसर्‍या दिवशी पहाटे कपड्यांशिवाय त्याला शहापूर महामार्गावर फेकून दिलं, ” असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. वरातीलाच लुटलं, चोरांनी बाकी सगळं सोडून नवरदेवाच्या गळ्यातील ‘वरमाला’ केली लंपास, पण का? शिवभगत दोन दिवस रुग्णालयात दाखल होता आणि अजूनही आघातातून बरा होत आहे. तो म्हणाला, “मी तिच्यासाठी सर्व काही केलं, तिच्या इच्छेनुसार एक छोटंसं घर बांधलं, तिच्यासाठी नेहमी काहीतरी खरेदी करत राहिलो. तिची इच्छा माझी आज्ञा होती. तिने दुसर्‍या माणसासाठी माझा विश्वासघात केला आणि माझ्यावर क्रूरपणे हल्ला केला. ” भाविकाने त्याला भेटायला येताना आपल्यासाठी गिफ्ट आणण्यास सांगितलं होतं. ज्यात साडी, सोन्याचे झुमके, सोन्याचे पैजण आणि बांगड्या, नवीन पावसाळी शूज आणि छत्री याचा समावेश होता. शिवभगतने सांगितलं की “जेव्हा मी या सर्व भेटवस्तू घेऊन घटनास्थळी पोहोचलो तेव्हा ती आटगाव हायवेवर माझ्या क्रेटा कारमध्ये बसली आणि सर्व भेटवस्तू घेतल्या. यानंतर अचानक चार जण कारमध्ये घुसले, त्यांनी मला बाजूला ढकललं आणि माझ्या डोक्यावर चॉपरने हल्ला केला. त्यापैकी एकाने गाडी चालवायला सुरुवात केली,” आरोपींनी शिवभगत यांना एका रेस्टॉरंटमध्ये नेलं आणि सकाळपर्यंत बंद खोलीत वारंवार मारहाण केली, असं शहापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार उपासे यांनी सांगितलं. “आपल्या निवेदनात पीडितानं सांगितलं की, आरोपीने कपडे काढल्यानंतर त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यांनी त्याच्या दोन सोन्याच्या साखळ्या, सात बोटांच्या अंगठ्या काढून घेतल्या, त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि पहाटे पाचच्या सुमारास पळ काढला.” स्वत:चा बचाव करण्यासाठी पीडिताना पोलीस स्टेशन गाठलं आणि मदतीसाठी त्याच्या मित्रांना बोलावलं. मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी पाच आरोपींवर आयपीसी कलम 365, 506 आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात