भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 12 जून : जग पाहणारे डोळे, स्वप्न साठवणारे डोळे, प्रेम व्यक्त करणारे डोळे, डोळे हे जुलमी गडे यासारख्या वेगवेगळ्या उपमा आपण डोळ्यांना देतो. मात्र याच डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. लॅपटॉप, कॉम्पुटर आणि मोबाईल या सारखी आधुनिक उपकरणं ही आता सर्वसामान्यांच्या आयुष्याचा भाग बनली आहेत. कामाच्या निमित्तानं किंवा विरंगुळा म्हणून गेल्या काही वर्षात याचा स्क्रीन टाईम वाढलाय. हा स्क्रीन टाईम वाढल्यानं मायोपीया या आजाराचं प्रमाण वाढलं आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. मायोपिया म्हणजे काय? टीव्ही आणि मोबाईल स्क्रीनकडं सतत डोळे लावून पाहिल्यानं लांब पाहण्याची दृष्टी कमी होते, या आजाराला मायोपिया असं म्हणतात. चष्मा लागणे, चष्म्याचा नंबर सतत वाढणे यासारखे त्रास लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतात. इतकंच नव्हे तर या आजारात डोकेदुखी देखील बळावते.
कशी घ्यावी काळजी?तुमच्या मुलांना मायोपियापासून वाचवण्यासाठी त्यांचा स्क्रीन टाईम कमी करणे आवश्यक आहे. त्यांना मैदानात खेळायला पाठवणे, अभ्यास करतानाही दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांचा ब्रेक घेणे, या ब्रेकमध्ये दूर बघत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. दिव्या यांनी दिली. तासंतास रिल्स पाहिल्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार! आत्ताच सोडा सवय मायोपीया आहे की नाही हे पाहण्यासाठी वेगळ्या मशिनरी आणि साहित्य वापरावे लागते. डोळ्यात दोन प्रकारची औषध टाकून त्यानंतर सरध्या पद्धतीनेही डोळ्यांची तपासणी केली जाते आणि नंबर काढला जातो. विशेष म्हणजे ही तपासणी करताना काळजी घ्यावी लागते. चष्म्याचा नंबर चुकला तर मयोपिया वाढू शकतो अशी माहिती डॉ. अनघा हेरुर यांनी दिली.