जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dombivli News : तरुणांमध्ये वाढलं हृदय विकाराचं प्रमाण, जिमला जायचं की नाही? डॉक्टर म्हणतात... Video

Dombivli News : तरुणांमध्ये वाढलं हृदय विकाराचं प्रमाण, जिमला जायचं की नाही? डॉक्टर म्हणतात... Video

Dombivli News :  तरुणांमध्ये वाढलं हृदय विकाराचं प्रमाण, जिमला जायचं की नाही? डॉक्टर म्हणतात... Video

लहान वयातच ऱ्हदयविकाराचं प्रमाण अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढलंय. हा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 13 जून : आपल्या शरिरातील महत्त्वाचा आणि नाजूक अवयव म्हणजे हृदय. हृदयासंदर्भात अनेक कवींनी कविता लिहल्या आहेत. याच हृदयाला जपण्यासाठी भरपूर काळजी घ्यावी लागते.  हृदयविकाराचा एखादा झटका देखील जीवघेणा ठरू शकतो. धावपळीच्या जीवशैलीत याचं प्रमाण वाढलंय. अगदी तरुण वयातही अनेकांनी यामुळे जीव गमवलाय. सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये  हृदयाची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात डोंबिवलीतील डॉक्टर विवेक महाजन यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. हृदयविकारशी संबंधित 15 ते 20 टक्के रुग्ण हे 17 ते40 या वयोगटातील आहेत. अनेकदा लहान मुलांचंही हार्ट ऑपरेशन करावं लागतं. इतक्या कमी वयात या गंभीर आजाराची लागण कशी होते? हेच अनेकांना समजत नाही. त्यावरच डॉ. महाजन यांनी काही महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काय घ्याल काळजी? आपल्या सर्वांसाठीच विश्रांती ही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रोज सात ते आठ तास झोप आवश्यक आहे. आहारामध्ये त्याचबरोबर मीठ आणि तेलाचा वापर अत्यंत कमी करावा. मिल्क , डेरी प्रोडक्ट्स मुळे वजन वाढते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक संभवतो, असं डॉ. महाजन यांनी सांगितले. तुमची मुलं मोबाईल सतत पाहतात? लगेच सवय तोडा, अन्यथा ‘या’ आजाराची होईल लागण, Video व्यायाम आवश्यक पण… शरीराला व्यायामाची गरज असते. मात्र जिमला जाऊन अतिरिक्त व्यायम करणे टाळा. प्रोटीन पावडर, स्टिरॉइड्स आदी गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. हृदविकार टाळण्यासाठी व्यसन घेणे बंद करणे आवश्यक आहे. यामुळे इतर व्याधी देखील होणार नाहीत. हृदयविकार टाळण्यासाठी तणाव मुक्ती ही एक महत्त्वाची बाब आहे. यासाठी ध्यानधारणा करून तणाव मुक्ती मिळवू शकतो,’ अशी माहिती डॉक्टर महाजन यांनी दिली. एका दिवसात किती मीठ खाणं योग्य, 1 की 2 चमचे? योग्य प्रमाण वाचून बसेल धक्का हृदय विकाराची लक्षणे काय ? धाप लागणे, पाठीत भरून येणे, उजवा किंवा डावा हात जड झाल्यासारखा होणे, भरपूर घाम येणे, जीभ जड होणे, जबडा दुखणे, डोकं दुखणे आदी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय? स्ट्रेस टेस्ट केल्यानंतर हृदयात ब्लॉकेज आहेत का याचा साधारण अंदाज येतो. ही टेस्ट अगदी सोपी असते. अ‍ॅन्जॉग्राफी म्हणजे काय ? स्ट्रेस टेस्ट मध्ये ब्लॉकेज आहेत असे लक्षात आले तर एंजोग्राफी ही टेस्ट करावी लागते. यामध्ये किती ब्लॉकेज आहेत हे शोधता येते. अ‍ॅन्जोप्लास्टी आणि बायपास…. अ‍ॅन्जिओग्राफी झाल्यानंतर ब्लॉकेजची संख्या कमी असेल तर एन्जोप्लास्टी करण्यात येते. ब्लॉकेज अधिक असले तर बायपास करण्यात येत असल्याचं डॉ. महाजन यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात