भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
डोंबिवली, 24 मे 2023 : उन्हाचा तडाखा सध्या सर्वत्र वाढलाय. वाढत्या उन्हाळ्यात शहाळ्याचं पाणी पिण्यासाठी नागरिक गर्दी करतायत. शहरातील शहाळे स्टॉलवर गर्दी वाढलीय. पण, त्याचवेळी शहाळ्याची आवक कमी झालीय. डोंबिवलीमध्ये तर शहाळ्याची किंमत 10 ते 15 रुपयांनी वाढलीय. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय.
का वाढली किंमत?
दक्षिण भारतातून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शहाळ्याची आवक गेल्या काही दिवसांपासून रोडवल्याने त्यांच्या भावात वाढ झालीय. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश येथून नारळ विक्रीसाठी महाराष्ट्रात आणले जातात. दक्षिणेतील विविध राज्यांतून येणारा नारळ प्रथम मुंबईत दाखल होतो. त्यानंतर तो नवी मुंबई, ठाणे ,कल्याण , डोंबिवली तसेच आसपासच्या परिसरात विक्रीसाठी नेला जातो. गेल्या काही दिवसांपासून केरळ, आंध्र प्रदेश या भागांतून मुंबईत होणाऱ्या नारळाची आवक कमी झाल्याने दरवाढ झाल्याची माहिती डोंबिवली येथील नारळ विक्रेत्यांनी दिली आहे.
तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश येथे प्रतिकूल हवामानामुळे यंदा नारळाचे पीक कमी आले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच नारळाचे दर वाढले आहेत, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात 50 रुपयांना मिळणारे उत्तम प्रतीचे शहाळ्याची किंमत 60 ते 70 रुपयांपर्यंत पोहचली आहे.
सध्या चेन्नई येथून येणारी शहाळी मुंबई, ठाण्यात मोठय़ा प्रमाणात दिसत आहेत. केरळ आणि आंध्र प्रदेश येथील शहाळ्यांचे कवच पातळ असते. कडक उन्हामुळे ही शहाळी तडकण्याची शक्यता असते. याउलट चेन्नई येथून येणारी शहाळी कडक असल्याने त्यांची आवक व्यवस्थित होत आहे. चेन्नईतून दररोज चार ते पाच ट्रक भरून माल येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परंतु सध्या तापमानात मोठी वाढ झाली असल्याने शहाळ्यांची मागणी वाढली आहे. आवक कमी आणि मागणी अधिक या व्यस्त प्रमाणामुळे किमतीत वाढ झाली आहे, असे नारळ विक्रेते अनिल यांनी सांगितले.
विधवा महिला लावते लग्न, झाडाची केली जाते पूजा, मुंबईजवळील शहरात लग्नाची अनोखी प्रथा
शहाळ्याच्या गाड्या कमी येत असल्याने भाव अधिक सांगितले जात आहेत. त्यामुळे आम्हाला विक्री करणे परवडत ना्ही. पण, पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करावाच लागतो. मुळात विक्रेतेच अधिक पैसे देऊन माल देत असल्यानं शहाळ्याची किंमत वाढलीय, असं अनिल यांनी यावेळी सांगितलं.
शहाळे विक्री करण्यासाठी घ्यायला परवडत नाही. त्यामुळे आज माल घेतलाच नाही असे विक्रेते सांगतात. तर पोटा पाण्यासाठी व्यवसाय करावा लागतो त्यामुळे विक्रीसाठी अधिक पैसे देऊन माल घेतल्याचे विक्रेता अनिल सांगतो. मुळात विक्रतेच अधिक पैसे देऊन माल घेत असल्याने एक शहाळे 60 ते 70 रुपयाला विकत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून हा प्रश्न अधिक निर्माण झाल्याचं अनिल यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dombivali, Local18, Summer season