मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विधवा महिला लावते लग्न, झाडाची केली जाते पूजा, मुंबईजवळील शहरात लग्नाची अनोखी प्रथा

विधवा महिला लावते लग्न, झाडाची केली जाते पूजा, मुंबईजवळील शहरात लग्नाची अनोखी प्रथा

X
ठाणे

ठाणे जिल्ह्यातील लग्नाची ही अनोखी प्रथा तुम्हाला माहिती आहे?

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजात लग्नाची पद्धत कशी असते हे माहिती आहे का?

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी

ठाणे, 24 मे 2023 : मुंबईला खेटून असलेल्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक महानगपालिका आहेत. महनगरातील संस्कृतीप्रमाणेच ठाणे जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्याही मोठी आहे. यापूर्वी ही मंडळी डोंगरात राहात असतं. आता या तरूणांनी शिक्षणानंतर शहराची वाट धरलीय. त्यांची लग्नही आता शहरी पद्धतीनं होऊ लागलेत. पण काही तरूण अजूनही आपले मुळ संस्कृतीप्रमाणे व्हावे यासाठी पुढाकार घेत आहे. कशी होतात ही लग्न? पाहूया स्पेशल रिपोर्ट

निसर्गाची पूजा आदिवासीच्या लग्नात निसर्गाला मोठं महत्त्व आहे. या लग्नामध्ये धरतीमातेसह सूर्य,चंद्र डोंगर, पशू पक्षी यांच्या प्रतिकृतीचं तसंच झाडांचे पूजन केलं जातं. आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे. ही संस्कृती टिकवणे ही प्रत्येक आदिवासी बांधवांची जबाबदारी आहे, असा संदेश यामधून दिला जातो.

विधवा महिला लावतात लग्न..

आदिवासी विवाह सोहळ्यात मंगलाष्टक म्हणण्याचे काम डवल्या करतात. डवल्या म्हणजे विधवा स्त्रिया. या विधवा स्त्रिया हे लग्न लावतात. या मंगलाष्टका जवळपास एक तास चालतात. आदल्या दिवशी मंडप स्थापना करताना जंगलाची पूजा केली जाते. त्यानंतर लग्न करताना साक्षीला एक झाड आणले जाते. आदिवासी समजत विधवा महिलांना प्रचंड मान दिला जातो. हा समाज कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही.

मुंबई जवळील ‘या’ शहराला USA का म्हणतात? कारण वाचून तुम्ही कराल मान्य, VIDEO

ठाणे आणि पालघर हे सरकारी नियमानुसार आदिवासी जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर रायगड, नाशिक, अहमदनग या जिल्ह्यातही आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहातात. शहरी भागात राहण्यास गेलेल्या आदिवासी बांधवांमध्ये त्यांची संस्कृती आणि परंपरा विषयी जनजागृती करणे आवश्यक असल्याचं मत आदिवासी संघटनेच्या पदाधिकऱ्याने व्यक्त केले.

'आमचे बहुतेक समाज बांधव हे शहराकडं वळले आहेत. त्यांना आदिवासी संस्कृतीचा विसर पडलाय. ही संस्कृती टिकावी म्हणून आम्ही पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं अशी माहिती संदीप लोतडे आणि मनीष धींडे या तरुणांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Local18, Marriage, Thane