भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 11 जून : प्रत्येकाला आयुष्यात एका उंचीवर जाण्याची इच्छा असते. कधी कोणाला श्रीमंतीने उंची गाठायची असते. कधी कोणाला विचाराने तर कधी कोणाला उच्च पदी विराजमान होऊन उंची गाठावी अशी आशा असते. मात्र, डोंबिवलीतील एका 5 वर्षाच्या चिमुरडीने तिच्या वडिलां समवेत जगातील उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर जाऊन अनोखी उंची गाठली आहे. कशी केली तयारी? डोंबिवलीतील 5 वर्षीय प्रिशा निकाजू हिने वडील लोकेश निकाजू यांच्या सोबत एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत जाण्याचे ठरवले होते आणि नऊ दिवासात ती 17 हजार 598 फूट उंचीवर पोहचली. एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाण्याआधी डोंबिवलीतील पलावा फेज दोनमध्ये राहणारी प्रिशा रोज 5 ते 6 मैल चालत असे. तिला कराटे, टेबल टेनिस, पोहणे आवडते. त्यामुळे ती सतत या सर्व खेळांचा सराव करत असते असे तिची आई सीमा निकजू सांगतात.
दोन वर्षांची असल्यापासून करते ट्रेकिंग प्रिशा दोन वर्षांची असल्यापासून ट्रेकिंग करते. इतकेच नव्हे तर तिने सिंहगड, लोहगड, विसापूर, कर्नाळा, सोंडाई, कोथळी गड, प्रबळमाची, कलावंतीण , रायगड, असे गड सर केले आहेत. तिने वयाच्या तिसऱ्या वर्षी कळसूबाई शिखर सर केले आहे. विशेष म्हणजे एव्हरेस्ट बेस सर करताना तिला कोणताही त्रास झाला नाही, असे तिचे वडील लोकेश निकाजू सांगतात.
Kalyan News : कल्याणची चाळ ते टीव्ही स्टार, पाहा कसा झाला चिमुरड्या हर्षदाचा प्रवास, Video
अशी झाली आवड निर्माण प्रीशाचे वडील लोकेश निकाजू यांना ट्रेकिंगची आवड आहे. दर शनिवारी रविवार ते प्रिशाला घेऊन ट्रेकिंगला जात असल्याचे ते सांगतात. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियारींग अँड अलाईड स्पोर्ट्स या संस्थेचे ते माजी प्रशिक्षणार्थी आहेत. त्यामुळे ते स्वतः प्रीशाला मार्गदर्शन करतात.