जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai News: आयुर्वेदिक औषधांमुळे किडनीवर होतो परिणाम? डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं, पाहा Video

Mumbai News: आयुर्वेदिक औषधांमुळे किडनीवर होतो परिणाम? डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं, पाहा Video

Mumbai News: आयुर्वेदिक औषधांमुळे किडनीवर होतो परिणाम? डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं, पाहा Video

Mumbai News: आयुर्वेदिक औषधांमुळे किडनीवर होतो परिणाम? डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं, पाहा Video

आयुर्वेदिक औषधांमुळे खरंच किडनीवर परिणाम होतो का? पाहा डॉक्टर काय सांगतात?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लतिका तेजाळे, प्रतिनिधी मुंबई, 11 जून: सर्वसामान्य व्यक्ती आजारी पडू नये म्हणून आयुर्वेदाची सामाजिक आरोग्याची संकल्पना आजही उपयोगी आहे. आयुर्वेद हजारो वर्षांपासून लोकांना बरे करणारी आणि त्यांचे पालनपोषण करणारी प्राचीन भारतीय औषध पद्धत आहे. परंतु आजही सर्वसामान्य जीवनात आयुर्वेद पूर्णपणे स्वीकारले गेले नाही. आयुर्वेदाच्या बाबतीत अनेकांच्या मनात आजही शंका असतात. अशीच एक शंका म्हणजे आयुर्वेदिक उपचारांचा किडनीवर परिणाम होतो. आयुर्वेदिक औषधांवर लोकांचे आक्षेप आयुर्वेदिक उपचार पद्धत प्राचीन असली तरी त्यावर काही आक्षेप घेतले जातात. सर्वात महत्त्वाचं आक्षेप म्हणजे आयुर्वेदिक उपचारानंतर गुण येण्यास फार विलंब होतो. तर काही उपचारांबाबत प्रश्नही उपस्थित केले जातात. आयुर्वेदिक औषधांमुळे किडनीचे आजार होत असल्याचाही एक समज आहे. तसेच त्यात स्टेरॉईड वापरले जात असल्याची शंकाही व्यक्त केली जाते. याबाबत आयुर्वेदातील वैद्य अक्षता पंडित यांनी याबाबत माहिती दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आयुर्वेदिक औषधांमुळे किडनीचा आजार होतो? अक्षता पंडित यांनी फार सोप्या व स्पष्ट शब्दात याबाबत माहिती दिली आहे. चुकीच्या पद्धतीमुळे, चुकीच्या फार्माची औषधे वापरल्यामुळे किंवा अत्यंत स्वस्त भस्म वा धातू वापरल्यामुळे त्याचे किडनीवर डिपॉझिशन होते. आयुर्वेदामध्ये कुठलाही धातू मग तो पारा असला तरी त्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून ते औषधात वापरले जाते, असे पंडित यांनी सांगितले. हा आहे देशातील सर्वात महागडा आंबा, किंमत वाचून बसेल धक्का तर किडनीवर डिपॉझिट होणार नाही आयुर्वेदात पाऱ्याचे मारण केले जाते. म्हणजेच खलवं यंत्रात त्याला खूप काळ खलवला जातो व तो मोजण्यासाठी आयुर्वेदात अनेक पॅरामीटर्स आहेत. त्या पैकी एक नीश:चंद्रत्व असा आहे. यात पाऱ्याचा पूर्ण चकचकीत पणा निघून जातो. त्यामुळे तो हलत नाही तो स्थिर होतो. बोटांच्या रेषेत ती पावडर अडकली गेली याचा अर्थ असा की ते किडनीवर डिपॉझिट होणार नाही. उत्तम प्रकारच्या धातूचा भस्म वापरल्यास त्याचा किडनीवर डिपॉझिशनचा प्रश्नच उद्भवत नाही. राहिला प्रश्न स्टिरॉईडसचा, तर शुद्ध आयुर्वेदामध्ये कुठलेही स्टेरॉईड वापरले जात नाहीत. त्यामुळे आयुर्वेद हा विश्वसनीय त्याच प्रमाणे परिणामिक असल्यामुळे त्याला स्वीकारण्यात काही हरकत नाही, असेही पंडित सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात