जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News : हा आहे देशातील सर्वात महागडा आंबा, किंमत वाचून बसेल धक्का

Viral News : हा आहे देशातील सर्वात महागडा आंबा, किंमत वाचून बसेल धक्का

हा आहे देशातील सर्वात महागडा आंबा, किंमत वाचून बसेल धक्का

हा आहे देशातील सर्वात महागडा आंबा, किंमत वाचून बसेल धक्का

बाजारात मिळणाऱ्या एका आंब्याची किंमत ही साधारणपणे 10 रुपयांपासून 50 रुपये इतकी असते. पण अलीराजपूर येथे पिकणाऱ्या या वेगळ्या जातीच्या आंब्याची किंमत ही 1200 रुपये इतकी आहे. तेव्हा भारतातील या सर्वात महागड्या आंब्याविषयी जाणून घेऊयात.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

भोपाळ, 10 जून : तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात महागडा आंबा कोणता आहे? नसेल तर न्यूज 18 लोकमत तुम्हाला या खास आंब्याबद्दल सांगणार आहे, जो फक्त मध्य प्रदेशातील अलीराजपूरमध्ये मिळतो. या जातीची केवळ तीनच झाडे येथे असल्याचे सांगितले जाते. या आंब्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण बाजारात मिळणाऱ्या एका आंब्याची किंमत ही साधारणपणे 10 रुपयांपासून 50 रुपये इतकी असते. पण अलीराजपूर येथे पिकणाऱ्या या वेगळ्या जातीच्या आंब्याची किंमत ही 1200 रुपये इतकी आहे. तेव्हा भारतातील या सर्वात महागड्या आंब्याविषयी जाणून घेऊयात. सध्या भोपाल येथे आंबा महोत्सव साजरा केला जात आहे. फळांचा राजा आंब्याचे भव्य प्रदर्शन येथे आयोजित करण्यात आले होते. या आंबा महोत्सवात ‘नूरजहाँ’ आंबा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. हा आंबा पाहून लोकांना तो विकत घेण्याचा मोह होत होता पण या आंब्याची किंमत ऐकून सर्वच हैराण झाले. Tulsi Upay : आर्थिक अडचणीचा करताय सामना, तुळशीच्या झाडामुळे होईल सुटका, अयोध्येतून आला उपाय अलीराजपूरच्या काठीवाड्यातून आलेल्या रुमाल बघेलने या आंबा महोत्सवात विशेष प्रकारचे आंबे आणले होते, ज्यांचे वजन तब्बल दोन किलो होते. ‘नूरजहाँ’ असे या आंब्याचे नाव असून तो जगातील सर्वात महागड्या आंब्यांपैकी एक आहे. नूरजहाँ या आंब्याच्या फळाचे वजन 2 ते3 किलो असते. यामुळे हा आंबा किलोनुसार नाही, तर प्रति नग किंमतीने विकला जातो. एका आंब्याची किंमत 1200 रुपये ठेवण्यात आली आहे. मध्य प्रदेश सोडला तर संपूर्ण देशात नूरजहाँ आंबा कुठेच मिळत नाही. या आंब्याचे उत्पादक रुमाल बघेल सांगतात की, मी पूर्ण विश्वासाने सांगत आहे की, आमच्याशिवाय हा आंबा तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही. आम्ही वर्षभरात फक्त 100 आंब्यांचे उत्पादन घेतो. हा आंबा घेण्यासाठी मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतून मागणी येते. आंबे खाऊनही वजन कमी करता येईल? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत रुमल बघेल यांनी सांगितले की, नूरजहाँ आंबा हा अधिकतर अफगाणिस्तानमध्ये तयार होतो. 1577 ते 1645 या काळात जेव्हा भारतात आणला गेला तेव्हा या आंब्याचे नाव मल्लिका नूरजहाँ ठेवण्यात आले कारण त्यांना हा आंबा खूप आवडला होता. नंतर या आंब्याची काही रोपे मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथे आणण्यात आली. तेव्हापासून येथे नूरजहाँ आंबे पिकू लागले. संपूर्ण देशात नूरजहाँ जातीच्या आंब्याची तीनच झाडे उरली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात