डोंबिवली, 20 जुलै : मुसळधार पावसामुळे बुधवारी दिवसभर डोंबिवली नंतर पुढील स्थानकात लोकल ट्रेन जात नव्हत्या. याचवेळी कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान एक ट्रेन बराच वेळ थांबली होती. या ट्रेन मधील एका डब्यात 6 महिन्याच एक छोटं बाळ, तिची आई आणि आजोबा बसले होते. मात्र भिवंडी गाठायची असल्याने त्यांनी बराच वेळ वाट बघून ट्रेन मधून उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्या चिमुरडीच्या जीवावर बेतला. आई आजोबांच्या हातात बाळ देत असताना ते आजोबांकडून सटकले आणि बाजूलाच असलेल्या नाल्यात पडले. हे बाळ 24 तास उलटून गेल्यानंतरही मिळाले नाही. प्रशासनाकडून सुरू असलेले शोध कार्य गुरुवारी दुपारी 2 वाजता अखेर थांबवण्यात आले आहे. काय घडलं? भिवंडी येथे राहणाऱ्या योगिनी रुमाले या वडील ज्ञानेश्वर यांच्याकडे बाळंतपणासाठी आल्या होत्या. मात्र ऋषिताची तब्येत ठीक नसल्याने तिला वाडिया रुग्णालयात उपचार सुरू होते. यासाठीच आजोबा आणि आई चिमुरड्या ऋषितला डॉक्टरांकडे वाडिया येथे घेऊन गेले होते. मात्र, परत येताना पावसाचा जोर वाढल्याने ट्रेन डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान बराच वेळ थांबली.
योगिनी रुमाले आणि तिच्या वडिलांना भिवंडी गाठायचे असल्याने येथे उतरून आपण रस्त्यावर जाऊ आणि तेथून रिक्षेने घरी जाऊ असे त्यांनी ठरवले. यावेळी योगिनीचा पाय पाईपमध्ये अडकल्याने बाळाला माझ्याकडे दे असे सांगून बाळ घेण्यासाठी हात पुढे केला. मात्र याचवेळी बाळ हातातून सटकले आणि थेट नाल्यात पडल्याचे आजोबा ज्ञानेश्वर यांनी सांगितले.
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 16 वर, आजचे बचावकार्य थांबवले
एनडीआरएफच्या टीमने अखेर शोधकार्य थांबवले रात्री उशिरापर्यंत हे शोध कार्य सुरू होते त्या नंतर काळोख झाल्याने शोधकाम थांबवले. मात्र गुरुवारी सकाळपासून हे शोध कार्य पुन्हा सुरू केले. मात्र अखेर दुपारी 2 नंतर हे शोध कार्य थांबवले.

)







