जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : वाशीत अग्नितांडव, ठाण्यातही इमारतीला लागली आग; अनेक जण अडकल्याची भीती

Video : वाशीत अग्नितांडव, ठाण्यातही इमारतीला लागली आग; अनेक जण अडकल्याची भीती

एपीएमसी फळ मार्केट आग

एपीएमसी फळ मार्केट आग

ठाण्यात इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. ठाणे पश्चिममधील एका इमारतीला आग लागली आहे. तर दुसरीकडे वाशी एपीएमसीमधील फळ मार्केटला देखील आग लागल्याची घटना घडली आहे.

  • -MIN READ Thane,Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे 17  नोव्हेंबर :  ठाण्यात इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. ठाणे पश्चिममधील एका इमारतीला आग लागली आहे. धवलछाया असं या आग लागलेल्या इमारतीचं नाव आहे. आग लागलेल्या या इमारतीमधून धूर आणि आगीचे लोळ उठताना दिसत आहेत. या इमारतीमध्ये काही ज्येष्ठ नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आगीची घटना समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमनदलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली यांच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. इमारतीमध्ये काही जण अडकल्याची भीती   ठाणे पश्चिममध्ये असलेल्या धवलछाया या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आग लागलेल्या ठिकाणावरून आग आणि धुराचे लोळ निघत आहेत. या इमारतीमध्ये काही ज्येष्ठ नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा :   Nagpur : प्लॅस्टिकमुक्तीसाठी पालिका मैदानात, नागरिकांना दिला नवा पर्याय, Video फळ मार्केटला आग   दुसरीकडे वाशी एपीएमसीमधील फळ मार्केटला देखील आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरून आग आणि धुराचे लोळ हवेत झेपावत आहेत. घटनेची माहिती मिळताच तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीचं कारण देखील अद्याप अस्पष्ट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: thane
  • First Published :
जाहिरात
जाहिरात