मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! वडिलांच्या मृत्यूनंतर 6 जणांना कोरोना झाल्याचा दावा, नंतर समोर वेगळंच सत्य

धक्कादायक! वडिलांच्या मृत्यूनंतर 6 जणांना कोरोना झाल्याचा दावा, नंतर समोर वेगळंच सत्य

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे क्लॉटिंग डिसऑर्डरसुद्धा होण्याची भीती असते. ज्यामुळे इस्किमिक किंवा हेमरेजिक (रक्तस्राव) स्ट्रोक देखील होतो. या विषाणूंमुळे मेंदू आणि मेनिन्जेसमध्ये थेट संसर्ग होऊ शकतो. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणालीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे मेंदू आणि नसा खराब होऊ शकतात.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे क्लॉटिंग डिसऑर्डरसुद्धा होण्याची भीती असते. ज्यामुळे इस्किमिक किंवा हेमरेजिक (रक्तस्राव) स्ट्रोक देखील होतो. या विषाणूंमुळे मेंदू आणि मेनिन्जेसमध्ये थेट संसर्ग होऊ शकतो. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणालीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे मेंदू आणि नसा खराब होऊ शकतात.

या टेस्टमध्ये 12 पैकी 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचा दावा संबंधित लॅब कडून करण्यात आला होता. 

ठाणे, 7 जून : वडिलांच्या मृत्यूनंतर कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकाच कुटुंबातील 10 जणांनी एका खाजगी लॅबमध्ये कोरोनाची टेस्ट केली. त्यांच्यासोबत शेजारी राहणारे इतर दोन जण त्यांचादेखील रिपोर्ट आला. या टेस्टमध्ये 12 पैकी 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचा दावा संबंधित लॅब कडून करण्यात आला होता.  मात्र रिपोर्ट या कुटुंबीयांच्या हातात न दिल्याने मोठे गूढ निर्माण झाले आहे.

या 12 जणांची चाचणीही 36 हजार खर्च करून त्यांना रिपोर्ट देण्यात येत नसल्याने खासगी लॅब आणि हॉस्पिटलमध्ये मोठे रॅकेट असल्याचा आरोप मुंब्र्यातील या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला आहे. मुंब्र्यात खान नावाचे कुटुंब राहात असून किडनी विकाराने त्रस्त असलेल्या या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर खान कुटुंबीयांनी आपल्या घरातील 10 जणांचे आणि शेजारी राहणाऱ्या दोन अशा एकूण 12 जणांची टेस्ट खासगी लॅबमध्ये केली होती. यातील सहा जणांची टेस्ट ही पॉझिटिव्ह आली. मात्र या लॅबकडून त्यांना रिपोर्ट देण्यात आले नाही.

हापालिकेने या सर्व प्रकारानंतर त्यांना 10दिवस क्वारंटाईन केले. इथे देखील टेस्ट केल्यानंतर या सहा जणांची टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र क्वारन्टाइन सेंटरमध्ये देखील त्यांच्या हातात रिपोर्ट देण्यात आले नाही. एकूणच खासगी लॅब आणि खासगी हॉस्पिटलमध्ये साखळी असल्याचा आरोप आता या कुटुंबीयांनी केला आहे.

दुसरीकडे, ठाणे महापालिकेने देखील या खासगी लॅबचे रिपोर्ट योग्य नसल्याचे सांगत थायरोकेयर लॅबवर कारवाई केली असल्याने आता ठाण्यात खासगी लॅबचे मोठे रॅकेट समोर आले आहे. तसेच या बाबत आम्हाला न्याय व आमचे पैसे परत मिळावेत, अशी सदर कुटुंबीयांनी विनंती केली असून अशा लॅबवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी विनंती देखील खान कुटुंबीयांनी केली आहे.

थायोरोकेअर लॅब या आयसीएमआरच्या अधिकृतप्रयोगशाळेत कोव्हिड 19 च्या स्वॅब तपासणीत 6 प्रकरणात चुकीचा अहवाल आढळल्याने या लॅबला ठाण्यात कोव्हिड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे. ठाणे शहरात कोव्हिड - 19 ची प्राथमिक लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेकडेच करण्यात येते. थायोरोकेअर लॅब आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेच्या यादीमध्ये घोषित करण्यात आली होती. परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदरप्रयोगशाळेने दिलेल्या 6 प्रकरणांमध्ये चुकीचा अहवाल असल्याचे आढळून आले. यामुळे अनेक रूग्णांना सामाजिक आणि मानसिक त्रासातून जावे लागले होते.

First published:

Tags: Coronavirus, Thane news