मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: ठाण्यात लसीकरण केंद्रावर जोरदार राडा; शिवसेना पदाधिकारी एकमेकांत भिडले

VIDEO: ठाण्यात लसीकरण केंद्रावर जोरदार राडा; शिवसेना पदाधिकारी एकमेकांत भिडले

ठाणे शहरातील लसीकरण केंद्रावर मनपाच्या नगरसेवक आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कब्जा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठाणे, 3 जुलै : कोरोनावर मात करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid Vaccine) नागरिकांना उपयोगी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान ठाण्यात एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. ठाणे मनपाच्या लसीकरण केंद्रावर (Thane Vaccination Center) स्थानिक नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाल्याचं समोर आलं.

ठाणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीच्या तुटवड्या अभावी दोन दिवस लसीकरण बंद होते. शनिवारी लस उपलब्ध झाल्यानेही नागरिकांनी लसीकरणासाठी मोठी गर्दी केली होती. शिवाई नगर येथील नगरसेवकीच्या पतीने आदल्या दिवशी काही नागरिकांना कुपन वाटले होते. हे कुपन घेऊन आज नागरिक लसीकरणासाठी दाखल झाले मात्र त्याचवेळी वॉक इन लसीकरणासाठीही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

म्युकरमाकोसिसमुळे पोलीस कर्मचाऱ्याने गमावला डोळा; नैराश्येत उचललं टोकचं पाऊल

वॉक इन आलेल्या नागरिकांना परत पाठवले जात असल्याने स्थानिक नागरिक आणि नगरसेवक, त्यांचे कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. याच दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी एकमेकांना भिडल्याचंही पहायला मिळालं. एकूण राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांच्या श्रेयवाद हा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालं.

First published:

Tags: Coronavirus, Thane