नागपूर, 3 जुलै: नागपूर शहरातील (Nagpur City) एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (Policeman Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव प्रमोद मेरगुवार (Pramod Merguwar) असे आहे. म्युकरमायकोसिस **(mucormycosis)**मुळे नैराश्येतून त्याने हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. कोविडवर मात केल्यानंतर काही जणांना म्युकरमायकोसिस झाल्याचं समोर आलं आहे. म्युकरमायकोसिसमुळे काही रुग्णांनी आपले डोळा गमवल्याचंही समोर आलं आहे. नागपूर पोलीस दलातील स्पेशल पोलीस युनिटमध्ये कार्यरत असलेला कर्मचारी प्रमोद मेरगुवार याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकास उघडकीस आला आहे. Weekend Lockdown मध्ये आमदार रवी राणांकडून नियम पायदळी; उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस कर्मचारी प्रमोद मेरगुवार याला काही दिवसांपूर्वी कोविड झाला होता. कोविडवर त्याने मातही केली होती. मात्र, त्यानंतर त्याला म्युकरमायकोसिस झाला. म्युकरमायकोसिस झाल्याने त्याने आपला एक डोळा गमावला. एक डोळा गमावला आणि दुसरा डोळा 80 टक्के कार्यरत नसल्याचं समोर आलं. एकूणच या परिस्थितीमुळे प्रमोद मेरगुवार हा नैराश्येत गेला होता. नैराश्येत त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या कोरोना बाधितांना मधुमेह आहे आणि मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. या आजारात नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका आढळून येतो. वेळेत उपचार झाले नसल्यास रुग्णाला डोळा, श्वसन आणि मेंदूवर विपरीत परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.