मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Thane Car Sank : ठाण्यात पाण्याचा आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन चालकासह कार बुडाल्याचा थरारक video समोर

Thane Car Sank : ठाण्यात पाण्याचा आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन चालकासह कार बुडाल्याचा थरारक video समोर

ठाण्याच्या फडकेपाडा तलावामध्ये कार (fadakefada lake) बुडाल्याची घटना सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. (The car sank due to unpredictable water level in Thane)

ठाण्याच्या फडकेपाडा तलावामध्ये कार (fadakefada lake) बुडाल्याची घटना सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. (The car sank due to unpredictable water level in Thane)

ठाण्याच्या फडकेपाडा तलावामध्ये कार (fadakefada lake) बुडाल्याची घटना सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. (The car sank due to unpredictable water level in Thane)

  ठाणे, 12 जुलै : ठाणे (thane) परिसरात कार बुडाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने ही कार बुडाली होती. (The car sank due to unpredictable water level in Thane) ठाण्याच्या फडकेपाडा तलावामध्ये (fadakefada lake) बुडाल्याची घटना सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत, कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे माहिती देण्यात आली आहे. तर मुंबई चेंबुर (Mumbai chembur) येथील कारचालक युसुफ पठाण याला तेथील दक्ष व स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेत सुरक्षितपणे तलावाच्या बाहेर काढून जीवनदान दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे. (Thane Car Sank)

  ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला, साहेब दिवा, खर्डीगावच्या फडके पाडा कार बुडाली आहे. कार पूर्णपणे बुडाल्याने जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. मदतीची गरज असल्याचे पुढील व्यक्तीकडून सांगण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तातडीने, घटनास्थळी अग्निशमन केंद्राचे जवान १-फायर वाहन, १-रेस्क्यू वाहनासह दाखल झाले.

  हे ही वाचा : मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट; पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

  त्यावर तलावामध्ये बुडालेल्या चारचाकी वाहनांमधील चालक युसुफ पठाण (२८) याला तेथील स्थानिक नागरिकांनी सुरक्षितपणे तलावाच्या बाहेर काढले व वाहनांमध्ये इतर कोणीही व्यक्ती नसल्याची माहिती स्वतः वाहन चालकाने दिली. त्यानंतर शीळ पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तलावामध्ये बुडालेल्या चारचाकी वाहनाला रस्सीच्या सहाय्याने बाहेर काढून वाहन चालकाच्या ताब्यात दिले.

  रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने तलावामध्ये गेल्याची माहिती चालकाने दिली. ही कार मे. रजा एंटरप्राइजेस नामक कंपनीच्या मालकीची असल्याचे चालकाने सांगितले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

  हे ही वाचा : सुप्रीम कोर्टाने OBC आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली

  राज्यात मुसळधार पावसाने थैमान

  सध्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. मुसळधार पावसाने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. यातच आता हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे.

  बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनार्‍यावरील पूर्व-पश्चिम शियर, मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित होत आहे. यामुळे परिणामी 4-5 दिवसात मुंबई, ठाण्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाऊस होणार आहे. तसेच मराठवाड्यातही या दिवसात पावसाचा जोर दिसणार आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Thane, Thane (City/Town/Village), Thane skywalk, Weather forecast

  पुढील बातम्या