कुंदन जाधव, 07 फेब्रुवारी : ठाकरे गटाचे बाळापूर आमदार नितीन देशमुख यांना दोन दिवसांआधी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यात नारायण राणे आणि नितेश राणे यांचं नाव फोनवरून धमकी देणाऱ्यांनी घेतलं होतं. मुंबईत आले तर मारून समुद्रात फेकून देऊ असंही धमकी देणाऱ्यांनी म्हटलं होतं.
धमकी देणाऱ्यांच आवाहन स्वीकारून आमदार नितीन देशमुख आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मुंबईच्या नरिमन पॉइंटवर वॉक करतायेत 10 वाजून गेले मात्र धमकी देणारे अद्याप आले नाही. म्हणून शेवटी नितीन देशमुख त्या ठिकाणावरून निघून गेले.
हे ही वाचा : बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला का? नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया
नितीन देशमुखांवर आयकर विभागाची कारवाई
ठाकरे गटाचे बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावरील संकट संपता संपताना दिसत नाही. काही दिवसाआधी देशमुखांना एसीबी चौकशीला समोर जावं लागलं तर आज सकाळी चक्क जीवे मारण्याच्या धमकीचे दोन फोन आल्याचं नितीन देशमुखांनी सांगतली आहे. धमकी देणाऱ्यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांचं नाव घेऊन धमकी दिल्याचं म्हटलंय.
हे ही वाचा : भाजपची विनंती आणि राज ठाकरेंच्या पत्राला केराची टोपली, राष्ट्रवादीकडून अखेर चिंचवडमध्ये उमेदवार जाहीर
आता पर्यंत नारायण राणे यांनी मुंबईत मारून अनेकांना समुद्रात फेकून दिलं, असही धमकी देणाऱ्यांनी म्हटल्याच देशमुखांनी सांगितलं आहे. मुंबईला या तुमचाही समाचार घेऊ अस आवाहन धमकी देणाऱ्यांनी केल आहे. हे आवाहन स्वीकारून देशमुख मुंबईला आले. ज्या लोकांचे आता पर्यंत खून झाले, ज्यांचा ठावठिकाणा लागला नाही अश्यांचा 302 चा गुन्हा नारायण राणे यांच्यावर लावण्यात यावा अशी विनंती देशमुखांनी शासनाला केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.