Home /News /maharashtra /

राज्यात भीषण अपघात..! लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू, 23 हून अधिक जखमी

राज्यात भीषण अपघात..! लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू, 23 हून अधिक जखमी

वैजापूरजवळ दोन आयशरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा (five people died) मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  औरंगाबाद, 31 जानेवारी: औरंगाबादहून (Aurangabad) भीषण अपघाताची (Terrible Accident) बातमी समोर येत आहे. वैजापूरजवळ दोन आयशरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा (five people died) मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 23 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवराई फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी तीन जणांची नावं- कविता आबासाहेब वडमोर (वय वर्ष 45), प्रज्ञा गौतम गायकवाड (वय वर्ष 17), मोनू दिपक वावहळे (वय वर्ष 8) इलेक्ट्रिक बसचा Horrible अपघात, 17 वाहनांना धडक; 6 जणांना चिरडलं मृत पाच जणांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. जखमींना औरंगाबाद आणि नाशिक येथे हलवण्यात आलं आहे. पहाटे तीनच्या सुमारास शिवराई फाटा येथे हा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात लग्न लावून हे वऱ्हाडी नाशिकला जात होते.

  जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात

  काल जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात (major accident on old Mumbai Pune highway) झाला आहे. भरधाव कार आणि कंटेनरमध्ये धडक (Container and car collied)  झाली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू (5 people died) झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला हा अपघात झाला. (Major accident on Old Mumbai Pune Highway, 5 people died on the spot)

  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजक ओलांडून थेट पलिकडच्या मार्गावर गेली. त्यानंतर समोरुन येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

  बजेट नाही म्हणून थांबू नका; घरच्या-घरी Interior साठी या 7 पद्धती वापरून मिळवा Best Look अपघात झालेली ही गाडी हरियाणा पासिंगची असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात गाडीतील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. लोणावळा क्रॉस केल्यानंतर शिलाटणे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.  अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त गाडीतील नागरिकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या अपघातात पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या भीषण अपघातामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Aurangabad News

  पुढील बातम्या